Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी ‘थ्री ड्रिंक थिअरी’चा सोपा फॉर्म्युला; जाणून घ्या

उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवणे अत्यंत आवश्यक असून ‘थ्री ड्रिंक थिअरी’द्वारे ते सहज शक्य होते. या थिअरीनुसार दिवसभरात पाणी, जूस-सूप आणि आवडीचे पेय घेणे शरीरासाठी फायदेशीर ठरते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 13, 2025 | 09:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याचा तीव्र परिणाम सध्या जाणवू लागला आहे. तापमान दिवसेंदिवस वाढत असून सूर्य आग ओकत आहे. अशा वातावरणात शरीर तंदुरुस्त ठेवणे मोठे आव्हान ठरते. या दिवसांत पाण्याची कमतरता ही सामान्य बाब असते. शरीरातून घामाच्या स्वरूपात अधिक पाणी बाहेर पडल्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी ‘थ्री ड्रिंक थिअरी’ हा एक सोपा आणि उपयुक्त उपाय ठरू शकतो.

Banana Cutlet: संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी घरी बनवा पौष्टिक केळीचे कटलेट, नोट करा रेसिपी

आपले शरीर सुमारे ५० ते ७० टक्के पाण्याने बनलेले असते. शरीरातील प्रत्येक पेशीला कार्यक्षमतेने काम करण्यासाठी पाण्याची गरज असते. पाणी कमी झाले की पेशी दुर्बल होतात आणि थकवा जाणवतो. हायड्रेटेड राहिल्याने किडनी योग्यरीत्या काम करते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. यामुळे पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रिया सुरळीत चालते.

थ्री ड्रिंक थिअरीनुसार दिवसभरात तीन प्रकारचे पेय घ्यावेत. पहिला प्रकार म्हणजे साधा पाणी. दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जर साधा पाणी कंटाळवाणं वाटत असेल, तर त्यात लिंबू, सौंफ, पुदिना, दालचिनी किंवा चिया सीड्स घालून चव आणि पोषण वाढवता येते. दुसरा प्रकार म्हणजे फळे आणि भाज्यांचे रस किंवा सूप. यामध्ये टरबूज, खरबूज, पपई, संत्री, टोमॅटो, काकडी, गाजर, पालक इत्यादींचा समावेश करता येतो. यामुळे शरीराला मिनरल्स आणि पाण्याचे दोन्ही प्रमाण मिळते. हे घटक तुम्ही सूप किंवा सॅलड स्वरूपातही घेऊ शकता.

Ambedkar Jayanti: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त असे द्या भाषण

तिसरा प्रकार म्हणजे तुमच्या आवडीनुसार पेय. यात चहा, कॉफी, दूध, लस्सी, ताक यांचा समावेश होतो. मात्र, चहा आणि कॉफीमधील कॅफीनचे प्रमाण जास्त असल्याने ते मर्यादित प्रमाणातच घ्यावेत. दिवसाला २-३ कपांपेक्षा अधिक टाळावेत. शरीरात पाण्याची कमतरता नाही याची काही लक्षणे म्हणजे वारंवार तहान न लागणे, लघवीचा रंग फिकट किंवा स्वच्छ असणे, थकवा किंवा चक्कर जाणवत नसणे आणि त्वचेला हलकी चमक असणे. त्यामुळे उन्हाळ्यात ‘थ्री ड्रिंक थिअरी’चा अवलंब करून तुम्ही सहजपणे हायड्रेटेड राहू शकता आणि उष्णतेचा त्रास टाळू शकता.

Web Title: Learn the simple formula of three drink theory to stay hydrated in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 09:21 PM

Topics:  

  • Healthy Drinks
  • summer care tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Healthy Drink: ताकात चिया सीड्स मिक्स करून प्यायल्यास पचन आणि हायड्रेशनसाठी ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर
2

Healthy Drink: ताकात चिया सीड्स मिक्स करून प्यायल्यास पचन आणि हायड्रेशनसाठी ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.