ताकात चिया सीड्स मिक्स करून प्यायल्यास पचन आणि हायड्रेशनसाठी ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर
ताकामध्ये कॅलरीज, कर्बोदके, प्रथिने, चरबी, फायबर आणि कॅल्शियम इत्यादी आवश्यक घटक असतात. ताक प्यायल्यामुळे आतड्यांचे कार्य सुरळीत चालू राहते आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते.
चिया सीड्समध्ये मॅंगनीज आणि फॉस्फरस असतात. त्यामुळे ताक पिण्याच्या १० ते १५ मिनिटं आधी चिया सीड्स ताकात टाकून ठेवाव्यात. त्यानंतरच ताक प्यावे. नुसत्याच बिया खाल्ल्यास पोटाच्या समस्या वाढू शकतात.
वाढलेले वजन झपाट्याने कमी करण्यासाठी नियमित ताकात चिया सीड्स मिक्स करून प्याव्यात. ताकामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडून जाते.
चिया सीड्स आणि ताकामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे सर्दी खोकला इत्यादी आजारांची लागण होत नाही आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
चिया सीड्स आणि ताकामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि लोह इत्यादी घटक असतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.