Sibling Divorce म्हणजे काय?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर, सोनू कक्कर आणि संगीतकार-गायक टोनी कक्कर या भावंडाची गाणी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. मात्र ही भावंडं पुन्हा एकदा सोशल मीडियावर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहेत. काही दिवसांआधी सोनूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिले आहे, ती भावंडांसोबत असलेले नातं तोडत असल्याचे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यामध्ये तिने ‘सिबलिंग डिव्होर्स’ असे म्हणत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. मात्र आपल्यातील अनेकांना प्रश्न पडला असेल ना नेमका ‘सिबलिंग डिव्होर्स’ म्हणजे काय? चला तर जाऊन घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
हल्ली सोशल मीडियावर सिबलिंग घटस्फोट हा शब्द चांगलाच चर्चेत आहे. सोनू कक्करने लिहिलेल्या पोस्टमध्ये सिबलिंग घटस्फोट असा शब्द उल्लेखला आहे. सिबलिंग घटस्फोट म्हणजे बहीण भावंडांच्या नात्यांमध्ये बिघाड झाल्यानंतर किंवा भावंडांमधील नात्यात भावनिकदृष्ट्या अडचणी निर्माण झाल्यानंतर भावंडं दूर जातात. यामुळे भावंडांचं नातं तुटून जात. याशिवाय काही दिवसांआधी गायक अमाल मलिकनेसुद्धा भाऊ अरमान मलिक आणि आई-वडिलांसोबत असलेले नाते तोडले आहे.
सोनुने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे, तुम्हाला सर्वांना कळवताना खूप दुःख होत आहे की मी आता दोन प्रतिभावान सुपरस्टार, टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांची बहीण नाही. माझा हा निर्णय भावनिक वेदनांमधून आला आहे आणि आज मी खरोखर निराश आहे.’ असे म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे. मात्र सोनुने केलेली पोस्ट काही इन्स्टा अकाऊंटवरून डिलीट करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सोनू कक्कर आणि तिच्या भावंडांमध्ये नेमकं काय झालं असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोनू कक्कर, टोनी कक्कर आणि नेहा कक्कर ही तिन्ही भावंड सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहेत. त्यांनी आपल्या गाण्यांनी सगळ्यांचं भुरळ घातली आहे. या तीन भावंडांचा आवाज सगळीकडेच फेमस आहे.