लिव्हरचा वाढलेला आकार आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक!
निरोगी आरोग्यासाठी शरीरातील सर्वच अवयव निरोगी असणे आवश्यक आहे. कारण शरीरातील एका अवयवाच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. त्यामुळे रोजच्या आहारात शरीराला पचन होणाऱ्या हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. पण चुकीची जीवनशैली फॉलो केल्यामुळे लिव्हरचे कार्य बिघडते. लिव्हर शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. शरीरामध्ये दीर्घकाळ विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे पचनाची समस्या उद्भवू लागते. लिव्हरमध्ये हानिकारक पेशी वाढणे, लिव्हरचा आकार वाढणे इत्यादी अनेक लिव्हरसबंधित समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ‘या’ हिरव्या फळाचे करा सेवन, आरोग्याला होतील भरमसाट फायदे
चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पौष्टिक घटकांची कमतरता, सतत मद्यपान करणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे लिव्हरचा आजार वाढण्याची जास्त शकता असते. लिव्हरचा आहार वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे केल्यामुळे काहीवेळा जीव देखील जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिव्हरचा आकार वाढल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
लिव्हरचा आकार मोठा झाल्यानंतर पोटात जडपणा वाटू लागतो. याशिवाय पोटातील उजव्या बाजूला सूज आल्यासारखे वाटू लागते. पोटाला आलेल्या सुजमुळे काहीवेळा पोटात असह्य वेदना होऊ लागतात. या वेदनांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. लिव्हरचा आकार मोठा झाल्यानंतर अन्नपदार्थ खाल्यानंतर लगेच पोट भरते आणि पचनाची समस्या उद्भवू लागते. तसेच काहींच्या पोटाला हळूहळू सूज येऊ लागते.
शरीरातील अन्नपदार्थ पचन होण्यासाठी लिव्हर अतिशय महत्वाचा आहे. लिव्हरचा आकार मोठा झाल्यानंतर वारंवार अपचनाची समस्या उद्भवून पोटात गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा समस्या उद्भवते. ज्यामुळे सतत उलट्या होणे, मळमळ, अपचन होणे, अचानक भूक कमी होऊन जाणे इत्यादी गंभीर लक्षणे शरीरात दिसू लागतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.
लिव्हरला सूज आल्यानंतर किंवा लिव्हरचा आकार मोठा झाल्यानंतर सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरातील ऊर्जेची पातळी पूर्णपणे कमी होऊन जाते. दिवसभर शरीरात थकवा अशक्तपणा जाणवणे, काम करण्याची इच्छा न होणे, झोपल्यानंतर सुद्धा झोप पूर्ण न होणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागतात.
शरीरातील अवयवांमध्ये झालेल्या बदलांचा परिणाम लगेच डोळे आणि त्वचेवर दिसून येतो. डोळ्यांचा रंग बदलणे किंवा त्वचा पिवळसर दिसू लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. डोळे किंवा त्वचा पिवळी झाल्यानंतर काहीवेळा शरीरात कावीळ होण्याची शक्यता असते. याशिवाय त्वचा आणि डोळ्यांच्या खाली सतत खाज येऊ लागते.