Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही सुद्धा सकाळी कुंभकर्णासारखे ढाराढूर झोपता? ‘या’ सवयी तुम्हाला एका फटक्यात जागं करतील

जर तुम्ही सुद्धा सकाळी लवकर उठायचे ठरवून ढाराढूर झोपत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊयात, जे तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास मदत करतील.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 27, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

आपल्यापैकी अनेक जण असे असतात, ज्यांनी कितीही ठरवलं की सकाळी लवकर उठणार तरीसुद्धा ते उशिराच उठतात. याबाबत नेहमीच त्यांना घरातील मोठ्या व्यक्तींचे बोलणे देखील ऐकावे लागते. काही जण तर सकाळचा अलार्म सेट करतात मात्र तो स्वतःच बंद सुद्धा करतात. खरंतर, झोप मोडणे म्हणजे एखादे गोड स्वप्न मोडण्यासारखे आहे. यात रात्री उशिरा जागून उशिरा उठण्याची सवय ही आता आजच्या धावपळीच्या जीवनाचा एक भाग बनली आहे.

डॉक्टरांच्या मते, सकाळी उठताच, चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडा किंवा चेहरा धुवा. यामुळे शरीराला थोडा धक्का बसतोच, शिवाय मेंदूही जलद सक्रिय होतो. थंड पाणी त्वचेला स्पर्श करताच, शरीराच्या नसा जागे होतात आणि मेंदूमध्ये सतर्कता वाढते. यामुळे डोळ्यांतील आळस दूर होतो आणि शरीर सक्रिय वाटते. चला काही अशा सोप्या सवयींबद्दल जाणून घेऊयात, ज्यामुळे तुमची झोप लगेच उडेल.

Belly Button Piercing सुरक्षित आहे की नाही, वाढतोय ट्रेंड; नाभीत रिंग टोचून घेताना काय घ्याल काळजी

मोबाईलपासून अंतर ठेवा

झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीपासून दूर राहा. स्क्रीनवरून पडणारी ब्ल्यू लाइट ‘मेलॅटोनिन’ या झोपेसाठी महत्त्वाच्या हार्मोनवर परिणाम करतो, ज्यामुळे सकाळी थकवा आणि सुस्ती जाणवू शकते.

झोपेची वेळ ठरवा

रोज ठराविक वेळी झोपणे आणि उठणे तुमच्या शरीरातील नैसर्गिक घड्याळाला स्थिर ठेवते. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि सकाळी उठणे अधिक सहज होते.

सकाळचा प्रकाश

डोळे उघडल्यानंतर लगेच खिडकी उघडा किंवा थोडावेळ उन्हात घालवा. नैसर्गिक प्रकाश मेंदूला जागे होण्याचा संकेत देतो आणि दिवसभर उत्साही ठेवतो.

अलार्म थोडा दूर ठेवा

अलार्म किंवा मोबाईल बेडपासून थोड्या अंतरावर ठेवा, जेणेकरून तो बंद करण्यासाठी उठावे लागेल. ही कृती तुम्हाला झोपेच्या स्थितीतून बाहेर आणण्यास मदत करते.

Alzheimer’s Disease: ‘सैयारा’ चित्रपटातून चर्चेत आलेला आजार ‘अल्झायमर’! २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही धोका? जाणून घ्या

हलके स्ट्रेचिंग करा

झोपेतून उठताच बेडवरच थोडं स्ट्रेचिंग किंवा योगाभ्यास करा. यामुळे शरीरात ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि झोप पूर्णपणे दूर होते.

सकाळी उठणे ही एक आरोग्यदायी जीवनशैली आहे. जर तुम्हाला दिवस भरपूर उर्जेसह सुरू करायचा असेल, तर उठल्यावर सर्वप्रथम चेहरा धुण्याची सवय लावा. हा छोटासा बदल ताजेतवाने जाणवायला लावतो आणि तुमचा दिवस सकारात्मकतेने सुरू होतो.

Web Title: Lifestyle news best tips for waking up early in the morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • morning
  • sleep problems

संबंधित बातम्या

समोरचा व्यक्ती आहे तद्दन ‘खोटारडा’, सोप्या पद्धतीने ओळखा खोटं बोलणाऱ्या व्यक्ती
1

समोरचा व्यक्ती आहे तद्दन ‘खोटारडा’, सोप्या पद्धतीने ओळखा खोटं बोलणाऱ्या व्यक्ती

आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र…! दिवसाची सुरुवात करा ‘या’ सकारात्मक विचारांनी, आयुष्यात कायमच वाढेल स्वतःवरील विश्वास
2

आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र…! दिवसाची सुरुवात करा ‘या’ सकारात्मक विचारांनी, आयुष्यात कायमच वाढेल स्वतःवरील विश्वास

Navrashtra Navdurga: “..आणि तो दृष्टिहीन मुलगा मोटार रेसिंगमध्ये दुसरा आला”, नंदिनी हंबर्डे सांगतायत दृष्टिहीन मुलांची ‘डोळस’ गोष्
3

Navrashtra Navdurga: “..आणि तो दृष्टिहीन मुलगा मोटार रेसिंगमध्ये दुसरा आला”, नंदिनी हंबर्डे सांगतायत दृष्टिहीन मुलांची ‘डोळस’ गोष्

कधी सरस्वती तर कधी अन्नपूर्णा, मुंबईतील ‘या’ मंडळाच्या देवीचे रोज विविध रूप मिळेल पाहायला
4

कधी सरस्वती तर कधी अन्नपूर्णा, मुंबईतील ‘या’ मंडळाच्या देवीचे रोज विविध रूप मिळेल पाहायला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.