Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Liver Damage: लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर देतं ‘हे’ संकेत; वेळीच व्हा सावध, नाहीतर वाढू शकतो धोका

Liver Damage Early Symptoms: लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीरात कोणती लक्षणे दिसतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 12, 2026 | 08:33 PM
photo - yandex

photo - yandex

Follow Us
Follow Us:
  • लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर देतं ‘हे’ संकेत
  • लिव्हरच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे
  • कावीळ हे महत्त्वाचे संकेत का मानले जाते?
शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असलेले लिव्हर अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करणे, विषारी घटक बाहेर टाकणे, पचनक्रिया सुरळीत ठेवणे आणि रक्त शुद्ध करण्याचे महत्त्वाचे कार्य करते. मात्र बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, वाढते वजन, मद्यपान तसेच काही संसर्गजन्य आजारांमुळे लिव्हरशी संबंधित समस्या झपाट्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे लिव्हरचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट लक्षणे दाखवत नाहीत. त्यामुळे शरीरात काही लक्षणे वेळीच ओळखणे अत्यंत गरजेचे आहे.

पावसात भिजल्याने वाढू शकतो त्वचेच्या संसर्गाचा धोका; स्किन इन्फेक्शन, रॅशेस अन् खाज टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय

लिव्हरच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे

लिव्हरशी संबंधित समस्या सुरू झाल्यानंतर शरीर काही संकेत देत असते. सतत थकवा जाणवणे, भूक कमी लागणे किंवा अचानक वजन कमी होणे, वारंवार मळमळ होणे, अपचनाचा त्रास जाणवणे किंवा पोट जड वाटणे यांचा समावेश होतो. याशिवाय शरीरात अशक्तपणा जाणवणे, दैनंदिन कामांमध्ये उत्साह कमी होणे तसेच काही प्रकरणांमध्ये त्वचेवर खाज येणे किंवा शरीराच्या काही भागांवर हलकी सूज दिसणे ही देखील लिव्हरच्या बिघाडाची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. ही लक्षणे सतत जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

कावीळ हे महत्त्वाचे संकेत का मानले जाते?

लिव्हर नीट कार्य करत नसल्यास शरीरातील बिलीरुबिन हे पिवळसर रंगद्रव्य योग्य प्रकारे बाहेर टाकले जात नाही. त्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण वाढते आणि डोळे तसेच त्वचा पिवळी पडू लागते. ही स्थिती कावीळ म्हणून ओळखली जाते. अनेकजण तिला वेगळा आजार समजतात, परंतु ती लिव्हरच्या बिघाडाचे महत्त्वाचे लक्षण असू शकते.

ही लक्षणे दिसल्यास त्वरित सावध व्हा

  • लघवीचा रंग गडद होणे.
  • शौचाच्या रंगात बदल होणे.
  • पोट, पाय किंवा घोट्यांवर सूज येणे.
  • जास्त झोप येणे किंवा स्मरणशक्ती कमी होणे.
  • तीव्र पोटदुखी, वारंवार उलट्या किंवा काळसर अथवा रक्तमिश्रित शौच होणे. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?

संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे, पुरेसे पाणी पिणे, मद्यपान टाळणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे या सवयी लिव्हरचे आरोग्य जपण्यास मदत करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

High Protein Fruits: प्रोटीनसाठी फक्त अंडीच नाही! ‘ही’ फळे ठरू शकतात उत्तम पर्याय

Web Title: Liver health early signs of liver damage symptoms jaundice liver care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • healthy liver
  • Liver
  • Symptoms

संबंधित बातम्या

फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, औषधांसोबतच शरीराला मिळेल पोषण
1

फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, औषधांसोबतच शरीराला मिळेल पोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.