Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विना LPG घरी कोणकोणते पदार्थ बनवले जाऊ शकतात? न शिजवता तयार होणारे हे आहेत हेल्दी अन् टेस्टी ऑप्शन्स

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक करणे अनेकांसाठी आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत न शिजवता तयार होणारे हेल्दी आणि टेस्टी पदार्थ उत्तम पर्याय ठरू शकतात. हे पदार्थ केवळ सोपेच नाहीत तर पौष्टिकही आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 18, 2026 | 12:54 PM
विना LPG घरी कोणकोणते पदार्थ बनवले जाऊ शकतात? न शिजवता तयार होणारे हे आहेत हेल्दी अन् टेस्टी ऑप्शन्स

विना LPG घरी कोणकोणते पदार्थ बनवले जाऊ शकतात? न शिजवता तयार होणारे हे आहेत हेल्दी अन् टेस्टी ऑप्शन्स

Follow Us
Close
Follow Us:
  • अंकुरित धान्याची चाट, दही चुडा आणि सत्तू हे गॅसशिवाय तयार होणारे पौष्टिक पर्याय आहेत.
  • कोल्ड सँडविच, चटणी आणि ओव्हरनाईट ओट्स हे झटपट आणि चविष्ट पदार्थ सहज बनवता येतात.
  • गॅस नसतानाही योग्य आहार घेण्यासाठी असे नो-कुक पदार्थ उपयुक्त आणि आरोग्यदायी ठरतात.
आजकाल अनेक राज्यांमध्ये एलपीजी गॅसचे संकट ही एक सामान्य समस्या बनली आहे. हाॅटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद झाल्याने आता लोकांचे बाहेर खाणेही कठीण होऊन बसले आहे. ही समस्या कोणत्या एका शहरापुरती मर्यादित झाली नसून संपूर्ण देशभर गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. काही लोकांनी तर दिवसातून फक्त एकदाच स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. मध्य-पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम तेल बाजार, जहाज वाहतूक आणि पुरवठा साखळीवर होत आहे, जो सर्वसामान्य लोकांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत जर गॅस तुटवड्याचे प्रमाण आणखी वाढले तर त्यासाठी आपण आधीच तयार व्हायला हवे. गॅस संपला तर चिंता करु नका, कारण काही असे पदार्थही आहेत जे गॅसचा वापर न करता बनवले जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला असे काही खाद्यपदार्थांचे पर्याय सांगत आहोत, ज्यात तुम्हाला काहीही शिजवण्याची गरज भासणार नाही. गॅस संपला तरी, हे पदार्थ खाऊन तुम्ही २-४ दिवस जगू शकता.

World Oral Health Day : दात निरोगी तर जीवन आनंदी! मौखिक आरोग्य म्हणजे काय? जाणून घ्या

अंकुरित धान्याची चाट

तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये अंकुरित धान्याची चाट तयार करुन खाऊ शकता. हा एक हेल्दी आणि टेस्टी असा पर्याय आहे. यासाठी अंकुरलेले हरभरे किंवा मटकी घ्या. प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध हा पर्याय वजन नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. यासाठी एका बाऊलमध्ये अंकुरलेले धान्य, बारीक चिरलेली काकडी, कांदा आणि टोमॅटो घाला. तुम्ही त्यात सफरचंद, डाळिंब आणि इतर फळे देखील घालू शकता. चवीसाठी तुम्ही मीठ, चाट मसाला आणि लिंबू घालू शकता आणि याचा आस्वाद घ्या.

दही चुडा

दही चुडा हा बिहारचा एक पारंपारिक पदार्थ आहे. यात बाजारातून पोहे विकत घेऊन ते दह्यात मिक्स करुन खाल्ले जातात. उन्हाळ्याच याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते. याला शिजवण्याची किंवा उकळण्याची गरज नाही. तुम्ही ते नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात खाऊ शकता.

सत्तू

उन्हाळा सुरू होताच लोक सत्तू खायला सुरुवात करतात. पाण्यात सत्तू मिसळून प्यायल्याने उष्णतेत पोटाला थंडावा मिळतो. तुम्ही दुधात मिसळूनही सत्तू खाऊ शकता. गोड सत्तू पाणी आणि दूध दोन्हीसोबत चांगला लागतो. खारट सत्तू लिंबू, भाजलेले जिरे, काळे मीठ, चाट मसाला, कांदा आणि हिरव्या मिरच्यांसोबत खाल्ला जाऊ शकतो. सत्तू हा पदार्थ न शिजवता तयार केला जाणारा चविष्ट पर्याय आहे.

सँडविच

न शिजवता तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये कोल्ड सँडविचचाही समावेश होतो. लहान मुलांना हा पर्याय खास करुन फार आवडेल. यासाठी ब्रेडवर मेयोनीज, चटणी आणि भाज्या लावून सँडविच बनवता येतात. हे चविष्ट सँडविच काकडी, कांदा आणि टोमॅटो आणि चाट मसाला घालून चविष्ट सँडविच तयार करा.

World Down Syndrome Day: डाऊन सिंड्रोम म्हणजे काय? जगभरात ८०० पैकी १ बाळ प्रभावित, जाणून घ्या सविस्तर

चटणी

तुम्ही विविध प्रकारच्या चटण्या मिक्सरमध्ये वाटून भातासोबत खाऊ शकता. चटणीला फोडणी न देता देखील खाल्ले जाऊ शकते. मिक्सरमध्ये ओलं नारळ, हिरव्या मिरच्या, जिरं, मीठ, कोथिंबीर घालून छान चटणी तयार केली जाऊ शकते.

ओव्हरनाईट ओट्स

दह्यात किंवा दुधात ओट्स, आवडीची फळे आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करुन रात्रभर भिजवा आणि सकाळी नाश्त्यात याचे सेवन करा. याची चव तुमच्या सकाळची सुरुवात आणखी छान करेल आणि यामुळे पोट देखील भरलेले राहिल.

Web Title: Lpg crisis what to cook without gas lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • lifestyle news
  • LPG
  • lpg cylinder

संबंधित बातम्या

Alert ! सरकारने लागू केला LPG साठी नवा नियम ! त्वरित करा ‘हे’ काम नाहीतर Gas Connection होणार बंद
1

Alert ! सरकारने लागू केला LPG साठी नवा नियम ! त्वरित करा ‘हे’ काम नाहीतर Gas Connection होणार बंद

दुधाच्या पाकिटांवरील निळ्या, हिरव्या आणि नारंगी रंगांचा अर्थ काय? कोणते दूध आहे सर्वात चांगले; आजच जाणून घ्या
2

दुधाच्या पाकिटांवरील निळ्या, हिरव्या आणि नारंगी रंगांचा अर्थ काय? कोणते दूध आहे सर्वात चांगले; आजच जाणून घ्या

वृद्धांच्या सुरक्षेसाठी GPS ट्रॅकर्स ठरतात वरदान; सुरक्षिततेसाठी स्मार्ट उपाय, जाणून घ्या फायदे
3

वृद्धांच्या सुरक्षेसाठी GPS ट्रॅकर्स ठरतात वरदान; सुरक्षिततेसाठी स्मार्ट उपाय, जाणून घ्या फायदे

LPG Prices: सिलेंडरसाठी फक्त 150 रुपये! तेलाच्या संकटातही ‘या’ देशांमध्ये LPG सर्वात स्वस्त; कारण वाचून व्हाल थक्क
4

LPG Prices: सिलेंडरसाठी फक्त 150 रुपये! तेलाच्या संकटातही ‘या’ देशांमध्ये LPG सर्वात स्वस्त; कारण वाचून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.