
१० रुपयांच्या 'या' पदार्थाचा वापर करून घरीच बनवा होममेड टोनर, महागड्या ब्यूटी ट्रिटमेंटप्रमाणे चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो
चेहऱ्यावरील ग्लो हरवल्यानंतर त्वचा खूप जास्त निस्तेज आणि कोरडी पडते. पिंपल्स, ऍक्ने, मोठे मोठे डाग, सुरकुत्या इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे त्वचा खूप जास्त काळवंडल्यासारखी वाटू लागते. याशिवाय दुपारच्या वेळी जास्त वेळ बाहेर फिरल्यानंतर त्वचा खूप जास्त टॅन होते. टॅन झालेली त्वचा पुन्हा नव्याने उजळदार करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअरमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण वारंवार चुकीच्या स्किन केअरचा वापर केल्यामुळे कालांतराने चेहऱ्यावर गंभीर लक्षणे दिसू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी पडते. मेकअप केल्यानंतर सुद्धा चेहऱ्यावर ग्लो दिसत नाही. त्यामुळे मेकअप करण्याआधी टोनरचा वापर करावा. टोनर लावल्यामुळे त्वचा खूप जास्त हायड्रेट राहते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नॅचरल पदार्थांचा वापर करून टोनर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे टोनर उपलब्ध आहेत. चुकीच्या टोनरचा वापर केल्यास चेहऱ्यावर मुरूम आणि पिंपल्स येतात. टोनर लावल्यामुळे त्वचेचे रक्षण होते, त्यामुळे कायमच होममेड टोनर चेहऱ्यावर लावावे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये गुलाब पाणी आणि कोरफड जेल घेऊन व्यवस्थित मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर त्यात विटामिन कँप्सूल, केशर काड्या घालून पुन्हा एकदा मिक्स करा. तयार केलेले मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. त्यानंतर रात्री झोपण्याआधी आणि सकाळी उठल्यानंतर मेकअप करण्याआधी तयार केलेले टोनर त्वचेवर लावावे. यामुळे काही दिवसात चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल.
त्वचेसाठी विटामिन सी अतिशय महत्वाचे आहे. चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी विटामिन सी युक्त टोनरचा वापर करावा. टोपात पाणी गरम करून त्यात संत्र्याची साल टाकून उकळवून घ्यावे. पाणी थंड झाल्यानंतर गाळून घ्या. तयार केलेले टोनर स्प्रे बॉटलमध्ये भरून १५ ते २० दिवस नियमित वापरावे. संत्र्याच्या सालीमध्ये असलेले घटक त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात.