वाढत्या वयात चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित करा 'या' आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन
प्राचीन पुराणांमध्ये केवळ धार्मिक विषयांचीच नाही तर आरोग्यविषयकही बरीच माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या आधुनिक युगात कामाची धावपळ, अनियमित दिनचर्या, आहार आणि प्रत्येकाच्या पुढे जाण्याची लागलेली ओढ यामुळे अनेक लोकांना कमी वयातच विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी गरुड पुराणात आहारसंदर्भात काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे केल्यास अशक्तपणा, कमजोरीच्या समस्या दूर होऊन व्यक्ती ऊर्जावान राहू शकतो.(फोटो सौजन्य – istock)
हिंग, काळे मीठ आणि सुंठचा काढा करून प्यायल्यास पोटाचे आजार दूर होतात. पोट साफ आणि स्वच्छ राहिल्यास शरीर उर्जावान आणि ताकदवान राहते.जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना हिंगाचा वापर केला जातो. हिंगाच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. हिंग खाल्ल्यामुळे तिखट आणि तेलकट जेवण पचन होण्यास मदत होते. पोट दुखी, पोटात वाढलेल्या वेदना आणि आरोग्यासंबंधित इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हिंग आणि काळे मिठाचे सेवन करावे.
तीळ, अश्वगंधा, काळी तुळस आणि गुळ एकसमान प्रमाणात घेऊन याच्या छोट्या-छोट्या गोळ्या तयार करा. या गोळ्यांचे सेवन केल्यास शरीराला ताकद मिळेल. जवस, उडीद, गहू आणि पिप्पली बारीक कुटून त्यामध्ये तूप मिसळून हे मिश्रण शरीरावर लावा. हा उपाय नियमित केल्यास त्वचा दीर्घ काळापर्यंत चमकदार आणि स्वस्थ राहते.जर एखाद्या व्यक्ती दीर्घ काळापर्यंत वृद्धपणा, रोग, कमजोरीपासून दूर राहू इच्छित असेल तर त्याने नियामिपणे गायीच्या दुधाचे सेवन करावे.
जेवण केल्यानंतर खडीसाखर आणि लोणी खाणे लाभदायक राहील. या उपायाने पुरुषांची स्मरणशक्ती वाढते आणि शरीराला उर्जा मिळते. गायीच्या दुधाचे लोणी असेल तर जास्त उत्तम राहील.नियमित तुपाचे किंवा लोण्याचे सेवन केल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यायल्यास पचनक्रिया सुधारेल.
चमचाभर तांदळाचा वापर करून घरीच तयार करा महागडी क्रीम, हिवाळ्यातही राहील सुंदर आणि चमकदार त्वचा
गरुड पुराणानुसार जर एखाद्या पुरुषाने दररोज जेवणानंतर थोडासा गुळ खाल्ल्यास त्याला शरीरिक स्वरुपात भरपूर ताकद मिळते. गुळ जुना असेल तर जास्त लाभकारक राहील.त्रिफळा चूर्ण आणि मधाचे सेवन केल्यास दीर्घ काळापर्यंत डोळे स्वस्थ राहतील.






