सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत धिरडे
रात्रीच्या जेवणात सगळ्याच डाळ भात खाण्याची सवय असते. डाळभात खाल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटतं नाही. डाळ भात खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात आहारात डाळभात खाल्यास शरीराला पोषक घटक मिळतात. मात्र अनेकदा रात्रीच्या वेळी बनवलेला डाळभात शिल्लक राहिल्यानंतर तो दुपारच्या जेवणात खाल्ला जातो. तर अनेक लोक रात्री उरलेले जेवण फेकून देतात. असे न करता तुम्ही रात्री उरलेल्या डाळभातापासून चविष्ट धिरडे बनवू शकता. धिरडे हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो. सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये प्रामुख्याने कांदापोहे, उपमा, शिरा इत्यादी पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये डाळभातापासून चविष्ट धिरडे बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा