घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा हेल्दी टेस्टी दही कबाब
सकाळी उठल्यानंतर प्रत्येकालाच काहींना काही घाई असते. कामाला जाण्याची घाई, लहान मुलांना शाळेत जाण्याची घाई इत्यादी सर्वच गोष्टींची घाई असते. त्यामुळे घाईच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नाश्त्यात कायमच तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्यामुळे पचनक्रिया बिघडते. दिवसाची सुरुवातच अस्वस्थ आणि बिघडलेल्या पचनक्रियेने झाली तर दिवस अतिशय खराब जातो. त्यामुळे नाश्त्यात हलके आणि सहज पचन होणारे पदार्थ बनवावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही कबाब बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दही कबाब हा पारंपरिक पदार्थ आहे. दही कबाब तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा कुठेही बाहेर फिरायला जाताना बनवू शकतो. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. पण हे ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही दही कबाब बनवू शकता. जाणून घ्या दही कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
नवरात्रीच्या उपवासाला हलका नाश्ता हवा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा साबुदाण्याची तिखट खीर