
सुगंधित आणि सौम्य चवीने भरलेली कोलकात्याची नवाबी चिकन बिर्याणी बनवा घरच्या घरी; आजच नोट करा रेसिपी
भारतातील प्रत्येक शहराला बिर्याणीबद्दल स्वतःची खास ओळख आहे. हैदराबादी बिर्याणी मसालेदार, लखनवी बिर्याणी सौम्य व सुगंधी, तर कोलकाता स्टाईल चिकन बिर्याणीची खासियत म्हणजे तिची मऊसर, सौम्य आणि आलिशान चव. कोलकात्याची बिर्याणी ‘नवाब वाजिद अली शाह’ यांच्यापासून प्रसिद्ध झाली असे मानले जाते. लखनवी बिर्याणीला बंगाली स्पर्श देऊन कोलकाता बिर्याणी तयार झाली. यामध्ये जास्त मसाले वापरले जात नाहीत; त्याऐवजी सुगंधी बासमती तांदूळ, रसदार चिकन, केशराचा सुवास आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिजवलेले बटाटे! होय, कोलकाता बिर्याणी बटाट्यामुळेच वेगळी आणि अनोखी वाटते.
या बिर्याणीमध्ये हलकी गोडसर आणि सुगंधित चव जाणवते. बिर्याणीमध्ये अंडी आणि बटाटे घालणे हा कोलकात्याचा खास अंदाज आहे. बिर्याणी खाताना प्रत्येक घासात चिकन, बटाटा आणि मसाल्यांचा समतोल अनुभवता येतो. इतर बिर्याणी पेक्षा या बिर्याणीची चव जरा हटके असते, कोलकोत्याची शान म्हणून ओळखला जाणारा हा पदार्थ एकदा तरी घरी नक्की बनवून पाहा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
चिकन मॅरिनेशनसाठी:
कोलकाता स्टाईल बिर्याणीची खासियत काय?
बिर्याणीमधील भात सुगंधित असतो आणि मांस मऊसर शिजवले जाते. हलके मसाले आणि अंडा, बटाट्याचा यात खास करून समावेश केला जातो जो याला बिर्याणीला इतरांहून वेगळी ओळख देतो.