Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा प्रथिनेयुक्त काळ्या चण्यांचे कटलेट; लगेच नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी एक हेल्दी आणि टेस्टी पर्याय शोधत आहात तर मग काळ्या चण्याची कुरकुरीत टिक्की तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही टिक्की चवीला तर छान लागतेच शिवाय आपल्या आरोग्यासाठीही ती फायद्याची ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 02, 2025 | 09:44 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा प्रथिनेयुक्त काळ्या चण्यांचे कटलेट; लगेच नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा प्रथिनेयुक्त काळ्या चण्यांचे कटलेट; लगेच नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

काळे चणे हे प्रथिनांनी समृद्ध आहेत. याच्या सेवनाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होत असतात. अनेकदा यापासून मसालेदार भाजी तयार केली जाते मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही यापासून एक टेस्टी नाश्त्याचा प्रकार तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला काळ्या चण्यांपासून चवदार टिक्की कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.

पिकलेली खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट हाय प्रोटीन वडी

काळ्या चण्याची ही टिक्की चवीला मजेदार, पौष्टिक आणि सहज पचणारी असते. नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी ही टिक्की उत्तम पर्याय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही टिक्की आवडते. तुम्ही डाएट करत असाल तर तुमच्या डाएटसाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. शिवाय लहान मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही या पदार्थाचा समावेश करू शकता. चला लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • उकडलेले काळे चणे – १ कप
  • उकडलेला बटाटा – १ मध्यम आकाराचा
  • कांदा (बारीक चिरलेला) – १
  • हिरवी मिरची – २ (बारीक चिरलेल्या)
  • आले-लसूण पेस्ट – १ चमचा
  • हळद – १/४ टीस्पून
  • गरम मसाला – १/२ टीस्पून
  • धने पूड – १ टीस्पून
  • जिरं पूड – १/२ टीस्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – २ टेबलस्पून
  • लिंबाचा रस – १ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • रवा किंवा ब्रेडक्रम्स – कोटिंगसाठी
  • तेल – शेकण्यासाठी

नूडल्स, मोमोजमध्ये वापरलं जाणारं झणझणीत Chili Oil घरी कसं बनवायचं? नोट करा रेसिपी

कृती

  • काळ्या चण्यांचे कटलेट तयार करण्यासाठी सर्वप्रथम उकडलेले काळे चणे थोडे मॅश करा.
  • मॅश केलेल्या चण्यात उकडलेला बटाटा, कांदा, मिरची, आले-लसूण पेस्ट, सर्व मसाले, कोथिंबीर, लिंबाचा रस व मीठ घालून छान एकत्र करा.
  • या मिश्रणाचे लहान लहान गोळे करून टिक्कीसारखा चपटा आकार द्या.
  • तयार टिक्कींना रवा किंवा ब्रेडक्रम्स मध्ये हलकं फिरवा.
  • कढईत थोडं तेल गरम करून टिक्कींना मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करा.
  • गरमागरम टिक्की हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
  • अधिक हेल्दी व्हर्जन हवे असल्यास टिक्की एअर फ्रायर किंवा तव्यावर अगदी कमी तेलातही भाजू शकता.
  • लहान मुलांसाठी मिरची कमी करून तयार करावी.
  • ही टिक्की पौष्टिक, चवदार आणि हेल्दी पर्याय आहे जेव्हा तुम्हाला वेगळं काही खायला हवं असतं

Web Title: Make protein packed black chickpeas cutlets for breakfast recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 09:44 AM

Topics:  

  • food recipe
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Dal Recipes: रोज तीच डाळ खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा या 5 चविष्ट रेसिपी
1

Dal Recipes: रोज तीच डाळ खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा या 5 चविष्ट रेसिपी

जेवताना वाढेल जिभेची चव! ५ मिनिटांमध्ये बनवा चटपटीत शेंगदाण्याची सुकी चटणी, नोट करा रेसिपी
2

जेवताना वाढेल जिभेची चव! ५ मिनिटांमध्ये बनवा चटपटीत शेंगदाण्याची सुकी चटणी, नोट करा रेसिपी

Weekend Special : संध्याकाळचा नाश्ता होऊन जाऊद्या मजेदार, घरी बनवा ‘चिकन पाणिनी’, एकदा खाल तर पुन्हा बनवाल
3

Weekend Special : संध्याकाळचा नाश्ता होऊन जाऊद्या मजेदार, घरी बनवा ‘चिकन पाणिनी’, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

कोकणातील पारंपरिक पदार्थ! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा कुळीथाची पिठलं, पचनक्रिया राहील मजबूत
4

कोकणातील पारंपरिक पदार्थ! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा कुळीथाची पिठलं, पचनक्रिया राहील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.