Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’

Sitaphal Firni Recipe : थंडगार, सुगंधी आणि मऊसर सीताफळ फिरनी चवीला अप्रतिम लागते. ही रेसिपी घरच्यांना नक्कीच आवडेल आणि खास प्रसंगी तुमचा डेझर्ट टेबल अधिक आकर्षक बनवेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 20, 2026 | 03:35 PM
Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर 'सीताफळ फिरनी'

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर 'सीताफळ फिरनी'

Follow Us
Follow Us:
  • ताज्या सीताफळांपासून तयार करण्यात आलेली ही फिरनी चवीला अप्रतिम लागते.
  • फिरनीची मऊ, गोडसर चव जेवणाची मजा आणखी वाढवते.
  • मेजवानीची रंगत वाढवायची असेल तर सीताफळ फिरनी एक उत्तम पर्याय ठरेल.
सीताफळ म्हणजेच हंगामी गोड फळांची राणी. त्याचा नैसर्गिक सुगंध, मऊसर गर आणि गोडसर चव यामुळे कोणतीही डिश खास बनते. पारंपरिक फिरनी ही उत्तर भारतातील एक लोकप्रिय डेझर्ट असून ती तांदळाच्या पेस्टपासून तयार केली जाते. पण त्यात सीताफळाचा गर मिसळला तर तयार होते एक भन्नाट, सुगंधी आणि रॉयल चव असलेली सीताफळ फिरनी.

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

ही फिरनी सणासुदीला, पाहुणचारासाठी किंवा खास जेवणानंतर गोड म्हणून सर्व्ह करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. दूध, तांदूळ आणि साखर यांचा मखमली पोत आणि त्यात सीताफळाचा नैसर्गिक फ्लेवर मिळून ही डिश अधिक पौष्टिक आणि आकर्षक बनते. थंडगार सर्व्ह केल्यावर तिची चव आणखी खुलते. चला तर मग घरीच सोप्या पद्धतीने सीताफळ फिरनी कशी बनवायची याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • एक लिटर फुल क्रीम दूध
  • अर्धा कप तांदूळ
  • अर्धा ते तीन-चतुर्थांश कप साखर (चवीनुसार)
  • एक मोठे पिकलेले सीताफळ
  • अर्धा चमचा वेलची पूड
  • बदाम-पिस्त्याचे काप सजावटीसाठी
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास भिजत ठेवा. नंतर त्यातील पाणी काढून तांदूळ जाडसर वाटून घ्या. पेस्ट खूप बारीक करू नका, थोडी रवा सारखी टेक्स्चर असावी.
  • एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवा. दूध उकळी येईपर्यंत सतत हलवत राहा, जेणेकरून ते तळाला लागू नये.
  • दूधाला उकळी आल्यावर त्यात वाटलेला तांदूळ घाला. गॅस मंद ठेवा आणि सतत हलवत शिजू द्या. हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागेल.
  • तांदूळ पूर्ण शिजल्यावर त्यात साखर घाला आणि पुन्हा काही मिनिटे शिजवा. साखर पूर्ण विरघळली की वेलची पूड घाला.
  • दरम्यान, सीताफळ सोलून त्याचा गर काढा आणि बिया वेगळ्या करा. हा गर हलक्या हाताने मॅश करून घ्या.
  • गॅस बंद केल्यानंतर फिरनी थोडी थंड होऊ द्या. पूर्ण गरम असताना सीताफळाचा गर घालू नका, नाहीतर दूध फाटण्याची शक्यता असते. कोमट झाल्यावर त्यात सीताफळाचा गर मिसळा आणि छान एकजीव करा.
  • तयार फिरनी वाट्यांमध्ये काढा आणि किमान दोन ते तीन तास फ्रिजमध्ये ठेवा. सर्व्ह करताना बदाम-पिस्त्याचे काप घालून सजवा.

Web Title: For special occasion make tasty sitaphal firni at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने
1

Healthy Salad Recipe: डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल रेसिपी! पेरूपासून झटपट बनवा टेस्टी हेल्दी सॅलड, सगळेच खातील आवडीने

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘
2

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश
4

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.