नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिऱ्याचा हलवा
शारदीय नवरात्री उत्सवाला मोठ्या आनंद आणि उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. याशिवाय नऊ माळी पुजल्या जातात. महिलांसह पुरुषसुद्धा नवरात्री उत्सवात नऊ दिवस उपवास करतात. देवीची पूजा करून देवीच्या नऊ दिवस वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. तांदळाची खीर, शेवयांची खीर, शिरा इत्यादी पदार्थ कायमच बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला राजगिऱ्याच्या पिठाचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उपवासाच्या दिवशी राजगिऱ्याचे सेवन केले जाते. त्यामुळे दुपारच्या आहारात किंवा संध्याकाळच्या वेळी छोटी मोठी भूक लागल्यानंतर तुम्ही राजगिऱ्याच्या हलवा खाऊ शकता. राजगिरा हा पदार्थ अतिशय सहज पचन होतो. त्यामुळे कोणत्याही सणाच्या दिवशी किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही राजगिऱ्याचा हलवा बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
नवरात्रीच्या उपवासाला हलका नाश्ता हवा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा साबुदाण्याची तिखट खीर