हाताचे काळवंडलेले कोपरे स्वच्छ करण्यासाठी 'या' घरगुती पदार्थांचा नक्की करा वापर
निरोगी आरोग्यासाठी शरीर स्वच्छ असणे आवश्यक आहे. यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित अंघोळ करून शरीर स्वच्छ केले जाते. मात्र दिवसभरातून एकदा अंघोळ करून शरीर स्वच्छ होत नाही. त्यामुळे शरीर स्वच्छ करताना काही गोष्टींची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा शरीर स्वच्छ करताना शरीरात असणाऱ्या काही अवयवनाकडे दुर्लक्ष केले जाते. हाताचा कोपरा, गुडघे, पायांचे घोटे इत्यादी अनेक शरीरातील अवयवनांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र शरीरावर हे भाग अतिशय काळे होऊन त्वचा कोरडी पडून जाते. त्यामुळे शरीरातील सर्वच अवयवनांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काळवंडलेले हाताचे कोपरे पुन्हा उजळ्वण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास हातांचे कोपरे उजळदार होतील.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरात हार्मोन्सचे असंतुलन झाल्यानंतर मान आणि हातांची त्वचा काळवंडून जाते. अशावेळी अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करतात. मात्र यासोबतच घरगुती उपाय केल्यास त्वचेवरील टॅनिंग निघून जाईल आणि चेहरा स्वच्छ होईल.
हाताचे काळवंडलेले कोपरे उजळ्वण्यासाठी बटाट्याचा रस आणि लिंबाच्या रसाचा वापर करावा. कारण यामध्ये असलेले घटक नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून त्वचेवर काम करतात. याशिवाय त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. यासाठी वाटीमध्ये बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस मिक्स करून हातांच्या काळ्या झालेल्या कोपऱ्यांना किंवा मानेवर लावून काहीवेळा तसाच ठेवा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या.
वाटीमध्ये बेसन आणि मध एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यानंतर दही घालून जाडसर पेस्ट बनवा. तयार करून घेतलेली पेस्ट संपूर्ण हातांवर आणि मानेवर लावून काहीवेळा तसाच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर काहीवेळाने हाताचा कोपरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास त्वचा स्वच्छ होईल आणि काळे डाग निघून जातील.