Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजन वाढतंय पण तोंडाचे चोचले पुरवायचेत? मग घरी बनवा चविष्ट आणि कुरकुरीत असा Diet Chivda

डाएट चिवडा हा फक्त हेल्दीच नाही, तर खूपच स्वादिष्टही असतो! याची रेसिपी फार सोपी, सहज आणि चविष्ट आहे. तुम्ही एकदा बनवून पाहिलात तर तुम्हाला हा चिवडा पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 06, 2025 | 08:24 AM
वजन वाढतंय पण तोंडाचे चोचले पुरवायचेत? मग घरी बनव चविष्ट आणि कुरकुरीत असा Diet Chivda

वजन वाढतंय पण तोंडाचे चोचले पुरवायचेत? मग घरी बनव चविष्ट आणि कुरकुरीत असा Diet Chivda

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या जगात अनेकांना लठ्ठपणाची समस्या सतावत आहे. वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेकजण डाएटचा पर्याय निवडतात पण अरबट चरबट खाण्याची इच्छा काही डाएट करू देत नाही. अशात तोंडाचे चोचले देखील पुरवले तर पाहिजेत म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक चविष्ट आणि हेल्दी असा पदार्थ घेऊन आलो आहोत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे डाएट चिवडा!

अंड्याचा वापर न करता सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा केळीचे पॅनकेक, मोठ्यांनाही आवडेल पदार्थ

डाएट करणाऱ्यांसाठी चव आणि आरोग्य यामधील तोल साधणं थोडं कठीण असतं. पण जर तुम्हाला खमंग, कुरकुरीत आणि हलका नाश्ता हवा असेल तर डाएट चिवडा हा एक उत्तम पर्याय आहे. या चिवड्यामध्ये तळलेले साहित्य न वापरता कमी तेलात भाजलेले पोहे, डाळी आणि सुकामेवा वापरला जातो. त्यामुळे तो चविष्ट असूनही पचनास हलका आणि आरोग्यास लाभदायक असतो. हा चिवडा तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत किंवा मधल्या वेळेस खाऊ शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • पातळ पोहे – 2 कप
  • मूग डाळ – 2 टेबलस्पून
  • चणा डाळ – 2 टेबलस्पून
  • शेंगदाणे – 2 टेबलस्पून
  • बदाम/काजू (इच्छेनुसार) – 1 टेबलस्पून
  • कोरडी खोबऱ्याच्या काप – 1 टेबलस्पून
  • हिरव्या मिरच्या – 2 (चिरून)
  • कढीपत्ता – 8-10 पाने
  • हळद – ¼ टीस्पून
  • साखर – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • जिरं – ½ टीस्पून
  • हिंग – एक चिमूट
  • ऑलिव्ह ऑईल / कोकोनट ऑईल / तूप – 1 ते 1½ टेबलस्पून
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उच्च-प्रथिनेयुक्त पनीर कटलेट, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या, जाड बुडाच्या कढईत पातळ पोहे मध्यम आचेवर कोरडे खरपूस भाजून घ्या. ते कुरकुरीत झाले की बाजूला काढा.
  • त्याच कढईत थोडं तेल टाकून शेंगदाणे खरपूस परतून घ्या आणि काढा.
  • आता त्याच तेलात मूग डाळ आणि चणा डाळ थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.
  • खोबरं, बदाम/काजू आणि हिरव्या मिरच्या, कढीपत्ता पण हलकं परतून घ्या.
  • सर्व परतलेलं साहित्य एका मोठ्या भांड्यात मिसळा.
  • आता त्यात भाजलेले पोहे, हळद, साखर, हिंग, मीठ आणि जिरं टाका. सगळं एकत्र नीट मिक्स करा.
  • चिवडा थंड होऊ द्या आणि एअरटाइट डब्यात भरून ठेवा.
  • तुम्ही यामध्ये ड्राय फ्रूट्स आपल्या आवडीनुसार वाढवू शकता.
  • हा चिवडा 2-3 आठवडे साठवून ठेवला जातो.
  • ऑईल कमी वापरल्यामुळे तो डाएटसाठी योग्य आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

डाएट चिवडा काय आहे?
हा एक नाश्ता आहे, बहुतेकदा पारंपारिक चिवडाचा एक प्रकार आहे, जो आरोग्यदायी पर्याय आहे. यामध्ये सामान्यतः कमी तेल वापरले जाते .

डाएट चिवडा वजन वाढवतो का?
वजन कमी करण्यासाठी अनुकूल आहारात हे एक चविष्ट भर असू शकते. कमी तेलाचे प्रमाण, प्रथिनेयुक्त भाजलेले काजू आणि फायबरयुक्त पोहे यामुळे, तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात हा एक परिपूर्ण नाश्ता आहे.

 

Web Title: Make tasty and healthy diet chivda at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • Diet Plan
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

इथे दिवसा होते ‘गुड नाईट’ आणि रात्री ‘गुड मॉर्निंग’; भारतातील हे अनोखं ठिकाण कुठे वसलंय ते जाणून घ्या
1

इथे दिवसा होते ‘गुड नाईट’ आणि रात्री ‘गुड मॉर्निंग’; भारतातील हे अनोखं ठिकाण कुठे वसलंय ते जाणून घ्या

आता पर्यटनासाठी करा गावाची सफर! शिवरायांपासून ज्ञानोबापर्यंत या गावात आहे अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साठा…
2

आता पर्यटनासाठी करा गावाची सफर! शिवरायांपासून ज्ञानोबापर्यंत या गावात आहे अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साठा…

10 हजारांच्या बजेटमध्ये घेऊ शकता रॉयल सफर! फिरून या असे देश जिथे भारतीय रुपयाला आहे बक्कळ किंमत…
3

10 हजारांच्या बजेटमध्ये घेऊ शकता रॉयल सफर! फिरून या असे देश जिथे भारतीय रुपयाला आहे बक्कळ किंमत…

अरबी समुद्राच्या काठावर वसलेलं प्राचीन शिवमंदिर ज्याला पंतप्रधान मोदींनीही दिली भेट, जाणून घ्या सोमनाथ मंदिराला कसं जायचं…
4

अरबी समुद्राच्या काठावर वसलेलं प्राचीन शिवमंदिर ज्याला पंतप्रधान मोदींनीही दिली भेट, जाणून घ्या सोमनाथ मंदिराला कसं जायचं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.