अंड्याचा वापर न करता सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा केळीचे पॅनकेक
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच ठराविक पदार्थ खाण्याचा सगळ्यांचं कंटाळा येतो. नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि हेल्दी पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा डोसा खाऊन कंटाळा येतो. अशावेळी नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात अंड्याचा वापर न करता केळीची पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. केळी खाणे आरोग्यासाठी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय पॅनकेक तुम्ही लहान मुलांच्या डब्यात किंवा बाहेर फिरायला जाताना घेऊन जाऊ शकता. बऱ्याचदा लहान मुलांना केळी खायला आवडत नाही. चवीला गोड असलेली केळी अनेक लोक खात नाहीत. अशावेळी तुम्ही पॅनकेक किंवा इतर पदार्थ बनवून मुलांना खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)