संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उच्च-प्रथिनेयुक्त पनीर कटलेट
दिवसभर काम करून घरी थकून आल्यानंतर प्रत्येकालच भूक लागते. भूक लागल्यानंतर संध्याकाळच्या नाश्त्यात अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. ढोकळा, शेवपुरी, वडापाव, सामोसा इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. मात्र संध्याकाळच्या वेळी तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची असत शक्यता असते. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात पोट भरेल असे हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पनीर कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीर खाल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. लवकर भूक लागत नाही. याशिवाय नाश्त्यात अतितिखट किंवा सतत बाहेरील विकत पदार्थ खाऊ नये. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे कायमच घरी बनवलेले पदार्थ खावेत. जाणून घ्या पनीर कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
श्रावणात कांदा लसूणचा वापर न करता झटपट बनवा झणझणीत मसूर आमटी, वाफाळत्या भातासोबत लगेच चविष्ट