
Bharli Mirchi Recipe : भाजी काय करावं ते सुचत नाही? मग झटपट घरी बनवा गावरान स्टाईल 'भरली मिरची फ्राय'
भारतीय स्वयंपाकात मिरचीचा वापर केवळ तिखटपणा वाढवण्यासाठीच नाही तर तोंडाची चव वाढवण्यासाठीही केला जातो. महाराष्ट्रात तर “भरली मिरची” ही एक लोकप्रिय साइड डिश आहे जी भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत खाल्ली जाते. या रेसिपीमध्ये हिरव्या मोठ्या मिरच्यांमध्ये स्वादिष्ट मसाल्याचं सारण भरून त्या कुरकुरीत तळल्या जातात. थोड्याशा तेलात तळलेल्या या मिरच्या बाहेरून कुरकुरीत आणि आतून मसालेदार लागतात.
अनेकदा जेवणात आता नवीन काय भाजी करावं ते गृहिणींना सुचत नाही अशात एक सोपा, झटपट आणि चवीला झणझणीत लागणार हा पदार्थ तुमच्या जेवणाची रंगत वाढवेल. भरली मिरची फ्राय ही खास करून पावसाळ्यात किंवा थंडीत जेवणात एक वेगळी चव आणते. यासाठी लागणारा मसाला घरच्या घरी तयार करता येतो आणि त्याची चव इतकी अप्रतिम असते की एकदा चाखली की परत परत खाविशी वाटते. चला तर मग पाहूया ही झणझणीत पण स्वादिष्ट भरली मिरची फ्राय रेसिपी.
मिरच्यांसाठी: