(फोटो सौजन्य: Pinterest)
“भारतीय जेवणात विविध प्रकारच्या रोट्या, पराठे आणि भाकऱ्या आढळतात. पण त्यापैकी एक खास आणि रेस्टॉरंट-स्टाईल रोटी म्हणजे रुमाली रोटी. नावाप्रमाणेच ही रोटी अतिशय पातळ, मऊ आणि लवचिक असते अगदी रुमालासारखी! म्हणूनच तिला “रुमाली रोटी” म्हणतात. उत्तर भारतातील मुगलई आणि पंजाबी पदार्थांसोबत ही रोटी सर्व्ह केली जाते, विशेषतः बटर चिकन, पनीर बटर मसाला, किंवा कोरमा सारख्या रिच ग्रेव्ही डिशेससोबत.
रुमाली रोटीची खासियत म्हणजे तिची बनवण्याची पद्धत. ती मोठ्या आकारात पातळ लाटली जाते आणि तिला उलट्या कढईवर (किंवा तांब्या सारख्या पृष्ठभागावर) झटपट शेकले जाते. त्यामुळे ती हलकी, मऊ आणि सुगंधी लागते. घरच्या घरीही ही रोटी अगदी सहज तयार करता येते. फक्त थोडं संयम आणि योग्य टेक्निक गरजेची असते. चला तर मग घरच्या घरी रुमाली रोटी बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.
साहित्य :
कृती :
रुमाली रोटी ही भारतीय पाककलेतील एक अद्वितीय रोटी आहे जी हलकी, मऊ आणि चवदार लागते. ती घरच्या घरी तयार केल्यावर रेस्टॉरंटसारखा अनुभव मिळतो. पुढच्या वेळी तुम्ही खास पाहुण्यांसाठी डिनर बनवत असाल, तर या रुमाली रोट्या नक्की करून पाहा.






