थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी 'या' पद्धतीने बनवा मिक्स भाज्यांचे झणझणीत सूप
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची जास्त आवश्यकता असते. कारण सतत होणाऱ्या वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात भाज्यांचे सेवन करावे. भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक घटक आणि पोषण मिळते. वेगवेगळ्या भाज्यांमध्ये असलेले फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक आरोग्यासाठी प्रभावी ठरतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर भूक लागल्यानंतर सूप प्यावे. सूप पचन होण्यास अतिशय हलके असते. थंडीच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ होते. सतत जाणवणाऱ्या सर्दी, खोकल्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मिक्स भाज्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मिक्स भाज्यांचे सूप चवीला अतिशय सुंदर लागते. याशिवाय सूप बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. चला तर जाणून घेऊया मिक्स भाज्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
बेकरीसारखा ‘लादी पाव’ घरी कसा तयार कसायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी






