Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाकाहारी खाणाऱ्यांसाठी पर्वणी! आता घरीच बनवा हॉटेल स्टाईल ‘व्हेज सीख कबाब’; चवीला मस्त अन् सर्वांच्या आवडीची ठरणारी डिश

Veg Seekh Kebab Recipe : बहुतेकदा चिकन-मटणपासून बनवले जाणारे मऊदार सीख कबाब व्हेज शैलीमध्येही बनवले जाऊ शकतात. बटाटे, भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून याला तयार केले जाते जे चवीला अप्रतिम लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 14, 2025 | 09:00 AM
शाकाहारी खाणाऱ्यांसाठी पर्वणी! आता घरीच बनवा हॉटेल स्टाईल 'व्हेज सीख कबाब'; चवीला मस्त अन् सर्वांच्या आवडीची ठरणारी डिश

शाकाहारी खाणाऱ्यांसाठी पर्वणी! आता घरीच बनवा हॉटेल स्टाईल 'व्हेज सीख कबाब'; चवीला मस्त अन् सर्वांच्या आवडीची ठरणारी डिश

Follow Us
Follow Us:

व्हेज सीख कबाब हा भारतीय उपखंडातील एक लोकप्रिय शाकाहारी स्टार्टर आहे, जो वेगवेगळ्या भाज्या, मसाले आणि कधीकधी चवीसाठी इतर पदार्थ एकत्र करून बनवला जातो. कबाब अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात आणि यातीलच एक लोकप्रिय प्रकार म्हणजे सिख कबाब. मुघलाई पद्धतीने बनणारे कबाब प्रामुख्याने चिकन-मटणपासून बनवले जाते पण बदलत्या काळानुसार आता त्यांना शाकाहारी व्हर्जनमध्येही बनवले जाऊ लागले आहे ज्याची चव अप्रतिम लागते.

सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा ढाबा स्टाईल मशरूम मसाला; रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पर्याय

ही एक स्टार्टर डिश आहे जी बहुतेकदा काही खास प्रसंगी घरी बनवली जाते किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर आवर्जून ऑर्डर केली जाते. व्हेज सीख कबाब हे भाज्या, बटाटे, ब्रेडक्रम्ब्स आणि मसाले यांच्या मिश्रणातून तयार होतात. बाहेरून खमंग आणि आतून नरम असलेले हे कबाब पार्टी, पाहुणचार किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय आहे. शिवाय याची रेसिपी फार अवघड नसून तुम्ही सोप्या पद्धतीने तुम्ही ते घरी तयार करू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य :

  • बटाटे – ३ उकडून मॅश केलेले
  • गाजर – १ किसलेले
  • फरसबी – ½ कप बारीक चिरलेले
  • मटार – ½ कप उकडलेले
  • ब्रेडक्रम्ब्स – १ कप
  • आले-लसूण पेस्ट – १ चमचा
  • हिरव्या मिरच्या – २ बारीक चिरलेल्या
  • कोथिंबीर – २ टेबलस्पून चिरलेली
  • लाल तिखट – १ चमचा
  • गरम मसाला – ½ चमचा
  • जिरे पावडर – ½ चमचा
  • धणे पावडर – ½ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – तळण्यासाठी
  • लिंबाचा रस – १ चमचा
  • स्टिक्स (skewers)
कृती :
  • यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडेसे तेल घालून गाजर, फरसबी आणि मटार हलके परतून घ्या.
  • मोठ्या भांड्यात उकडलेले मॅश केलेले बटाटे घ्या. त्यात परतलेल्या भाज्या टाका.
  • आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, लाल तिखट, जिरे पावडर, धणे पावडर, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर टाकून छान मिक्स करा.
  • मिश्रणात ब्रेडक्रम्ब्स घाला आणि घट्टसर मिश्रण तयार करा. शेवटी लिंबाचा रस घाला.
  • हाताला थोडे तेल लावून मिश्रणाचे लांबट कबाबचे आकार शिकवर लावा.
  • तवा गरम करून थोडे तेल घाला आणि कबाब सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा.
  • तयार व्हेज सीख कबाब पुदिना-कोथिंबीर चटणी, कांदा आणि लिंबाच्या फोडीसह सर्व्ह करा.
  • तुम्हाला हवे असल्यास हे कबाब ओव्हनमध्ये ग्रिलही करू शकता, त्यामुळे ते आणखी हेल्दी होतील.
सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत खाकरा! विकतपेक्षा लागेल सुंदर चव

FAQs (संबंधित प्रश्न)

सीख कबाब तुटण्यापासून कसे रोखायचे?
कबाबांना आकार देण्यापूर्वी, कबाबांना हलके तेल लावा.

व्हेज सीख कबाब कसा खावा?
शेवटी, जर तुमच्याकडे पुदिन्याची चटणी किंवा पुदिन्याची चटणी आणि दहीला मिक्स करून डीप तयार करा आणि त्यासोबत खा.

Web Title: Make tasty veg seekh kabab at home perfect starter dish recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
2

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
4

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.