Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रविवारचा बेत करा खास, घरी बनवा हैरदराबादी स्टाईल ‘हरियाली चिकन’, रेसिपी जिंकेल सर्वांची मन

Hariyali Chicken Recipe : हरियाली चिकन ही हैदराबादची एक चविष्ट भाजी आहे जी चपाती, भाकरीसोबत खाल्ली जाऊ शकते. याची झणझणीत आणि सुगंधित चव नॉनव्हेज प्रेमींचे मन जिंकून घेते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 15, 2026 | 10:08 AM
रविवारचा बेत करा खास, घरी बनवा हैरदराबादी स्टाईल 'हरियाली चिकन', रेसिपी जिंकेल सर्वांची मन

रविवारचा बेत करा खास, घरी बनवा हैरदराबादी स्टाईल 'हरियाली चिकन', रेसिपी जिंकेल सर्वांची मन

Follow Us
Follow Us:
  • रविवार म्हणजे नॉनव्हेज खाण्याचा दिवस.
  • सुट्टीच्या या दिवशी घरी काही खास बनवा.
  • जाणून घ्या हरियाली चिकनची चविष्ट रेसिपी.
हैदराबादी पाककृतींची चव आणि सुगंध संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. मसाल्यांचा खास वापर, ताज्या हिरव्या पालेभाज्या आणि हर्ब्समुळे या पदार्थांना एक वेगळीच चव मिळते. हैदराबादमध्ये बिर्याणी, कबाब आणि विविध प्रकारच्या चिकन डिशेस खूप लोकप्रिय आहेत. त्यापैकीच एक चविष्ट आणि झटपट बनणारा पदार्थ म्हणजे हैदराबादी ग्रीन चिकन.

Summer Recipe : उन्हाळयात आता घरीच बनवा थंडगार आणि सर्वांच्या आवडीचा ‘फालुदा’, रेसिपी नोट करा

या डिशची खासियत म्हणजे त्यामध्ये वापरलेली हिरवी पेस्ट. कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या आणि मसाल्यांपासून तयार केलेली ही पेस्ट चिकनला एकदम फ्रेश आणि मसालेदार चव देते. त्यामुळे हा पदार्थ रंगाने हिरवा, सुगंधाने आकर्षक आणि चवीला खूपच लज्जतदार लागतो. हा पदार्थ भात, जिरा राईस, नान किंवा रोटीबरोबर खूप छान लागतो. खास पाहुणे आले असतील किंवा वीकेंडला काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून पाहा.

साहित्य

  • 500 ग्रॅम चिकन
  • 1 कप कोथिंबीर
  • ½ कप पुदिन्याची पाने
  • 3–4 हिरव्या मिरच्या
  • 1 मोठा कांदा (बारीक चिरलेला)
  • 1 चमचा आले-लसूण पेस्ट
  • ½ कप दही
  • ½ चमचा हळद
  • 1 चमचा धणेपूड
  • ½ चमचा जिरेपूड
  • 1 चमचा गरम मसाला
  • 2 चमचे तेल
  • चवीनुसार मीठ
  • थोडा लिंबाचा रस
लग्नाच्या पंगतीमधील चमचमीत मसाला भात आता घरीच बनवा, खमंग पदार्थाने वाढेल जेवणाची चव

कृती

  • सर्वप्रथम मिक्सरमध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या आणि थोडंसं पाणी घालून बारीक हिरवी पेस्ट तयार करा.
  • एका भांड्यात चिकन घ्या. त्यात दही, हळद, आले-लसूण पेस्ट आणि मीठ घालून चांगलं मिक्स करा. 20–30 मिनिटे मॅरिनेट होऊ द्या.
  • कढईत तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता.
  • आता त्यात धणेपूड, जिरेपूड आणि तयार केलेली हिरवी पेस्ट घालून 2–3 मिनिटे परता, जेणेकरून मसाल्यांचा सुगंध येईल.
  • मॅरिनेट केलेलं चिकन कढईत घाला आणि सर्व मसाल्यांबरोबर चांगलं मिक्स करा. झाकण ठेवून मध्यम आचेवर 15–20 मिनिटे शिजू द्या.
  • चिकन शिजल्यावर त्यात गरम मसाला आणि लिंबाचा रस घाला. 2 मिनिटे शिजू द्या.
  • गरमागरम हैदराबादी ग्रीन चिकन तयार आहे. वरून थोडी कोथिंबीर घालून नान, रोटी किंवा भातासोबत सर्व्ह करा.
 

Web Title: Make your sunday special know how to make hyderabadi style hariyali chicken at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • chicken
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी
1

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी

Shravan Special: श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत
2

Shravan Special: श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट Paneer Sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने
3

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट Paneer Sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी
4

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.