Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भधारणा होत नाहीये? शुक्राणूंची गुणवत्ता चांगली असूनही अडथळा? पुरुषांच्या ‘या’ समस्यांही असू शकतात कारण

Male Fertility Problems Reproductive Health: पुरुषांमध्ये ताठरता किंवा वीर्यस्खलनाशी संबंधित समस्या असल्यास शुक्राणू स्त्रीच्या पुनरुत्पादन मार्गापर्यंत पोहोचण्यात अडथळा येऊन नैसर्गिक गर्भधारणेच्या शक्यता कमी होऊ शकतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 19, 2026 | 06:33 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • पुरुषांमध्ये ताठरता किंवा वीर्यस्खलनाची समस्या?
  • गर्भधारणेच्या प्रयत्नांवर कसा होतो परिणाम
  • पुरुषांच्या ‘या’ समस्यांकडे करू नका दुर्लक्ष
पुरुषांमधील प्रजनन क्षमतेचे मूल्यांकन करताना शुक्राणूंची संख्या आणि त्यांची गुणवत्ता हे महत्त्वाचे घटक ठरतात, पण शरीरसंबंधादरम्यान शुक्राणू स्त्रीच्या पुनरुत्पादन मार्गापर्यंत पोहोचवण्याची क्षमता देखील दांपत्याच्या नैसर्गिक गर्भधारणेच्या (pregnancy) संधींवर परिणाम करू शकते. बिर्ला फर्टिलिटी अँड आयव्हीएफ, नागपूर येथील फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. प्रमोद येरणे यांच्या मते, लैंगिक कार्य आणि प्रजनन क्षमता या पुनरुत्पादक आरोग्याच्या परस्परांशी संबंधित असल्या तरी स्वतंत्र बाबी आहेत. एखाद्या पुरुषाचे शुक्राणू उत्पादन सामान्य असूनही त्याला ताठरता मिळवण्यात अडचण येऊ शकते. त्याचप्रमाणे, संबंध ठेवताना कोणतीही अडचण नसलेल्या व्यक्तीच्या सीमेन अॅनालिसिसचा अहवाल असामान्य असू शकतो.गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांची तपासणी करताना हा फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. (Male Fertility Problems)

Health Tips: फक्त चवीसाठीच नाही! वजन कमी करण्यापासून पचन सुधारण्यापर्यंत, वेलचीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

ताठरता आणि वीर्यस्खलनातील अडचणींचा प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो?

इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजे शारीरिक संबंधांसाठी पुरेशी ताठरता मिळवण्यात किंवा ती टिकवून ठेवण्यात सातत्याने येणारी असमर्थता. इरेक्टाइल डिसफंक्शनमुळे संबंध ठेवण्यात अडथळा येतो, तेव्हा नैसर्गिक गर्भधारणेच्या संधी कमी होऊ शकतात.वीर्यस्खलनाशी संबंधित विकार वेगवेगळ्या प्रकारे प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात.

वीर्यस्खलनास उशीर होणे किंवा स्खलन न होणे, यामुळे वीर्य योनीमार्गात सोडले जाण्यास अडथळा येऊ शकतो. काही पुरुषांमध्ये रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन समस्येमुळे वीर्य लिंगातून बाहेर पडण्याऐवजी मागे मूत्राशयामध्ये जाते. परिणामी, शुक्राणू स्त्रीच्या पुनरुत्पादन मार्गापर्यंत पोहोचू शकत नाहीत, ज्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा कठीण होते.

या अडचणी कशामुळे निर्माण होतात?

ताठरता आणि वीर्यस्खलनातील समस्या अनेक वैद्यकीय तसेच मानसिक कारणांमुळे उद्भवू शकतात. मधुमेह, हार्मोनल असंतुलन, मज्जासंस्थेशी संबंधित विकार, रक्ताभिसरणावर परिणाम करणाऱ्या समस्या आणि काही विशिष्ट औषधे सामान्य लैंगिक कार्यामध्ये अडथळा आणू शकतात.

उदाहरणार्थ, नियंत्रणात नसलेल्या मधुमेहामुळे ताठरता आणि स्खलनाशी संबंधित मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. विशेषतः स्त्रीबीज निर्मितीच्या (ओव्ह्युलेशन) कालावधीनुसार शारीरिक संबंधांचे नियोजन केले जाते, तेव्हा निर्माण होणारा मानसिक ताण आणि परफॉर्मन्स अँझायटी (कामगिरीची चिंता) देखील यात भर घालू शकते.पण, सातत्याने जाणवणाऱ्या या अडचणी केवळ मानसिक कारणांमुळे आहेत असे परस्पर मानू नये, कारण यामागे एखाद्या सुप्त वैद्यकीय आजारावर लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते.

या समस्यांचे मूल्यांकन आणि उपचार कसे केले जातात?

तपासणीची सुरुवात समस्येचे स्वरूप आणि समस्या किती काळापासून आहे हे समजून घेण्यासाठी सविस्तर वैद्यकीय व लैंगिक पार्श्वभूमी जाणून घेण्यापासून होते. या मूल्यांकनावर आधारित, डॉक्टर शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल आणि आकार तपासण्यासाठी सीमेन अॅनालिसिस करण्याचा सल्ला देऊ शकतात. उपचार समस्येच्या मूळ कारणावर अवलंबून असतात, ज्यामध्ये औषधोपचार, संबंधित आजारांचे नियंत्रण किंवा स्खलनाच्या विकारांवरील विशिष्ट वैद्यकीय उपायांचा समावेश असू शकतो.

हे उपाय करूनही नैसर्गिकरित्या गर्भधारणा न झाल्यास शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रजनन क्षमतेच्या इतर घटकांचा विचार करून गर्भाशयात वीर्य सोडणे (आययूआय) किंवा इंट्रासायटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शनसह (आयसीएसआय) आयव्हीएफ यांसारख्या सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञानाचा (एआरटी) विचार केला जाऊ शकतो. निवडक केसेसमध्ये शुक्राणू मिळवण्यासाठी विशेष प्रक्रियांचीही (स्पर्म रिट्रिव्हल) आवश्यकता भासू शकते.

वैद्यकीय तपासणी कधी आवश्यक असते?

गर्भधारणेचा प्रयत्न करताना सातत्याने ताठरता किंवा वीर्यस्खलनात अडचण येत असल्यास जोडप्यांनी तपासणीस उशीर न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा. समस्येचे मूळ कामजीवनात आहे, शुक्राणूंच्या गुणवत्तेत आहे की या दोन्हीमध्ये आहे, हे निश्चित केल्याने योग्य उपचार पद्धत ठरवण्यास आणि गर्भधारणेच्या शक्यता वाढवण्यास मदत होऊ शकते.

Health Tips: सतत थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? रोज खा ‘ही’ एक गोष्ट; शरीराला मिळतील अनेक फायदे

Web Title: Male fertility problems erectile dysfunction ejaculation problems barriers for pregnancy pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • male fertility reason
  • male infertility
  • pregnancy tips
  • Pregnant Issue

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.