Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?

शाळेत मराठी भाषेचं प्रत्येकाला व्याकरण शिकवलेलं असतं. त्या व्याकरणाच्या संबंधित क्रियापदं आजही चुकतात. भेटणं आणि मिळणं यातील फरक आज आपण समजून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 05, 2026 | 06:14 PM
Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?
Follow Us
Follow Us:
  • मराठीची बाराखडी
  • ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?
मराठी भाषा वळवावी तशी वळते हिच तर खरी या भाषेची गंमत आहे. एका भाषेची विविध रुपं असलेली पहिली जी भाषा आठवते ती म्हणजे मराठी. यातील असे कित्येक शब्द आहेत जे बरोबर असून ही चुकीच्या ठिकाणी वापरले जातात. ही चूक कमी शिकलेल्यांकडून होते हा निव्वळ गैरसमज आहे. या चुका करणारे अनेकदा सुशिक्षित माणसंच जास्त असतात. मराठी शब्दातल्या चुकांपैकी एक म्हणजे ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील होणारी गल्लत.

शाळेत मराठी भाषेचं प्रत्येकाला व्याकरण शिकवलेलं असतं. त्या व्याकरणाच्या संबंधित क्रियापदं आजही चुकतात. ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक आज आपण समजून घेऊयात. खूपदा असं होतं की, “मी पुस्तक शोधत होते आणि खुप वेळाने मला ते भेटलं”, असं वाक्य सहज म्हटलं जातं. पुस्तकंच असं नाही कुठलीही वस्तू खुप वेळाने शोधल्यावर सापडली की, नकळत सवयीप्रमाणे म्हटलं जातं ते म्हणजे ‘भेटलं’. पण तुम्हाला माहितेय का ? हे वस्तूंसाठी भेटणं हे क्रियापद अत्यंत चुकीचं आहे. खरं सांगायचं तर वस्तू मिळतात किंवा सापडतात. एखाद्या निर्जीव वस्तू किंवा एखादी संधी जेव्हा आपल्याला चालून येते तेव्हा ती मिळते. म्हणजेच उदाहरण द्यायचं झालंच तर,  “मला कामाच्या ठिकाणी नवी संधी मिळाली”. “मी कित्येक दिवस शोधत असलेलं पुस्तक मला सापडलं” किंवा ‘मिळालं’. आता हे झालं मिळणं या क्रियापदाविषयी.

Marathi Bhasha Din : ‘मराठी भाषा गौरव दिन’ अन् ‘मराठी राजभाषा दिनात गल्लत होतेय; जाणून घ्या काय फरक आहे?

 

आता भेटणं हे क्रियापद वापरतात तरी कधी तर हे ही आता जाणून घेऊयात. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलते, संवाद साधते आपण तिच्याशी गप्पा मारतो तेव्हा ते झालं ‘भेटणं’. म्हणजेच काय तर, “मला खूप दिवसांनी माझी जवळची मैत्रीण भेटली”. ” खूप दिवसांनी माझ्या जुन्या मित्राशी माझी भेट झाली”. एकंदरीतच सांगायचं झालं तर ‘माणसं भेटतात’ आणि’ वस्तू मिळतात’ किंवा सापडतात. तर अशी आहे ही मराठी भाषेची गंमत.

खरं सांगायचं तर, मराठी भाषा ही मैला-मैलांवर बदलते. बोलण्याची तिची लकब बदलते, त्यामुळे प्रमाण भाषा शुद्ध आणि गावची भाषा अशुद्ध असं होत नाही. मराठी भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नाही पण ती चुकीच्या पद्धतीने बोलण्यात येण्याने योग्य क्रियापदांच्या अर्थाचा अनर्थ होतो. म्हणूनच जर तुमचा सुद्धा भेटणं आणि मिळणं यात गल्लत होत असेल तर आजपासून चुकीचं न बोलता योग्य मराठी बोलण्याचा सराव करुयात. भाषा योग्य बोलली तर ती जगते आणि तेव्हाच ती वाढते.
जय महाराष्ट्र!

Marathi Bhasha Din : मराठी भाषा कशी निर्माण झाली ? साहित्य ते बोलीभाषा आतापर्यंतचा मराठीचा प्रवास खूपच रंजक

Web Title: Marathi bhasha marathi proverb what is the difference between meeting and getting in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Marathi Bhasha Gaurav Din

संबंधित बातम्या

Navratri Upvas Food : साबुदाणा खिचडीच नाही तर नवरात्रीच्या व्रतात सामील करा हे 5 भन्नाट उपवासाचे पदार्थ
1

Navratri Upvas Food : साबुदाणा खिचडीच नाही तर नवरात्रीच्या व्रतात सामील करा हे 5 भन्नाट उपवासाचे पदार्थ

Navratri Colors: गरबा नाइट्ससाठी राहा रेडी! नवरात्री २०२६ चे ९ रंग ठरले; जाणून घ्या महत्त्व आणि संपूर्ण दिनविशेष!
2

Navratri Colors: गरबा नाइट्ससाठी राहा रेडी! नवरात्री २०२६ चे ९ रंग ठरले; जाणून घ्या महत्त्व आणि संपूर्ण दिनविशेष!

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना
3

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम
4

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.