Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नसांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी चपातीच्या पिठात मिक्स करा ‘हे’ बारीक दाणे

वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. वाढलेल्या वजनामुळे इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 27, 2024 | 05:30 AM
चपातीच्या पिठात मिक्स करा या पौष्टिक बिया

चपातीच्या पिठात मिक्स करा या पौष्टिक बिया

Follow Us
Follow Us:

चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे अनेक वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन, धूम्रपान करणे, अपुरी झोप, तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.यामुळे प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे लठ्ठपणा, वाढलेले वजन. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. वाढलेल्या वजनामुळे इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची वाढ होणे, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची वाढ झाल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.(फोटो सौजन्य-istock)

लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी रोजच्या आहारात भात खाण्याऐवजी चपाती खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण भात खाल्यामुळे पोट लगेच भरते आणि अधिककाळ भूक लागत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी चपातीच्या पिठात कोणते पदार्थ मिक्स करावे, याबद्दल सांगणार आहोत. यामुळे तुमचे वाढलेले वजन झपाट्याने कमी होईल आणि इतर आजारांपासून शरीराचा बचाव होईल.

चपातीच्या पिठात मिक्स करा या पौष्टिक बिया:

अळशीच्या बियांचे फायदे:

अळशीच्या बिया आरोग्यसाठी अतिशय पौष्टिक आहेत. या बियांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. उच्च कोलेस्ट्रॉलची समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात अळशीच्या बियांचे सेवन करावे. अळशीच्या बियांची बारीक पावडर करून गहू किंवा मैद्याच्या पिठात मिक्स करून चपाती तयार करा. या चपातीचे नियमित सेवन केल्यास आरोग्यसंबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळेल.

तुळशीची पाने:

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली तुळशीची पाने आरोग्यसाठी अतिशय प्रभावी आहेत. तुळशीच्या पानांमध्ये आढळून येणारे अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. शिवाय यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. चपातीच्या पिठामध्ये तुळशीची पाने बारीक करून टाकल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल.

लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा

गव्हाचं पीठ:

चपाती बनवण्यासाठी पांढर पीठ वापरण्याऐवजी गव्हाचं पीठ वापरावे. गव्हाच्या पिठातील गुणधर्मांमुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते आणि वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. गव्हाच्या पिठाच्या चपात्या खाल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात चपातीचे सेवन करावे. तसेच यामुळे वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Mix in chapati batter including flax seeds to remove bad cholesterol accumulated in the veins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Weight loss

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर नियमित प्या एक ग्लासभर कोमट पाणी! डिटॉक्सपासून ते ग्लोइंग स्किनपर्यंत शरीराला होतील भरमसाट फायदे
1

सकाळी उठल्यानंतर नियमित प्या एक ग्लासभर कोमट पाणी! डिटॉक्सपासून ते ग्लोइंग स्किनपर्यंत शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.