Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? नो डाएटिंग, नो जिम; फक्त रोज करा ‘ही’ ६ कामे

Healthy Weight Loss Tips: तुम्हालाही जिमला न जाता किंवा डाएटिंग न करता घरच्या घरी वजन कमी करायचे असेल तर दररोजच्या जीवनाता या सोप्या सवयींचा अवलंब करा, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 17, 2026 | 06:14 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • वजन कमी करायचंय?
  • फक्त रोज करा ‘ही’ ६ कामे
  • दिसेल सकारात्मक बदल
डाएट सुरू करूनही वजन कमी होत नाही? तासन्‌तास जिममध्ये घाम गाळून किंवा उपाशी राहूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची तक्रार अनेकांची असते. प्रत्यक्षात वजन कमी करण्याचा खरा मंत्र डाएटमध्ये नसून, रोजच्या जीवनातील काही साध्या पण प्रभावी सवयींमध्ये दडलेला आहे. फिटनेस कोचच्या मते, सहा महत्त्वाच्या सवयी सातत्याने अंगीकारल्यास वजन कमी होण्यासोबतच शरीर अधिक तंदुरुस्त, ऊर्जावान आणि निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.

वारंवार गोष्टी विसरताय? सावध व्हा; मेंदू देतोय इशारा, अशी घ्या काळजी

संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या

वजन कमी करण्याची सुरुवात योग्य आहारापासून होते. आपल्या जेवणात प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश वाढवा. त्याचबरोबर रिफाइंड कार्बोहायड्रेट, साखर आणि जास्त चरबीयुक्त पदार्थांचे प्रमाण नियंत्रित ठेवा. संतुलित आहारामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि अनावश्यक खाण्याची सवय कमी होते.

दररोज चालण्याची सवय लावा

दिवसभर सक्रिय राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. दररोज किमान 6,000 ते 10,000 पावले चालण्याचा प्रयत्न करा. नियमित चालण्यामुळे कॅलरी खर्च होतात, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

नियमित व्यायाम करा

आठवड्यातून किमान तीन ते पाच दिवस व्यायाम करणे आवश्यक आहे. विशेषतः स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि हलका कार्डिओ यांचा समावेश केल्यास स्नायू मजबूत होतात, चयापचय सुधारतो आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

पुरेशी झोप घ्या

अपुरी झोप ही वजन वाढण्यामागील महत्त्वाची कारणांपैकी एक आहे. दररोज 7 ते 8 तासांची गुणवत्तापूर्ण झोप घेतल्यास हार्मोन्सचे संतुलन राखले जाते, भूक नियंत्रणात राहते आणि शरीराची  रिकव्हरी योग्य प्रकारे होते.

जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा

तळलेले, पॅकेजबंद आणि साखरयुक्त पदार्थांचे नियमित सेवन टाळा. त्याऐवजी फळे, भाज्या, कडधान्ये आणि घरगुती पौष्टिक पदार्थांना प्राधान्य द्या. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि अतिरिक्त कॅलरींचे सेवन कमी होते.

सातत्य आणि संयम ठेवा

वजन कमी करणे ही काही दिवसांची प्रक्रिया नसून दीर्घकालीन प्रवास आहे. रोजच्या छोट्या-छोट्या चांगल्या सवयींचे सातत्याने पालन केल्यास अपेक्षित परिणाम दिसून येतात. झटपट परिणामांच्या मागे न लागता संयम ठेवणे हेच यशाचे गमक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

वजन कमी करण्यासाठी महागडे डाएट प्लॅन किंवा कठीण व्यायामाची नेहमीच गरज नसते. योग्य आहार, नियमित हालचाल, व्यायाम, पुरेशी झोप, जंक फूडवर नियंत्रण आणि सातत्य या सहा सवयी अंगीकारल्यास निरोगी पद्धतीने वजन कमी करता येते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मुलांना रोज चॉकलेट खाण्याची सवय? पालकांनो सावधान! आरोग्यावर असा होतो परिणाम

Web Title: Weight loss tips without gym dieting fitness coach tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Weight loss
  • weight loss remedies
  • weight loss tips

संबंधित बातम्या

नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी बीटरूट गाजर टिक्की, वजन कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण
1

नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी बीटरूट गाजर टिक्की, वजन कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण

आतड्यांमध्ये साचलेली विषारी घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डिटॉक्स ड्रिंक, वजन होईल कमी
2

आतड्यांमध्ये साचलेली विषारी घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डिटॉक्स ड्रिंक, वजन होईल कमी

Belly Fat: सुटलेले पोट होईल फ्लॅट! जिमचीही गरज नाही, घरीच करा ‘हे’ सोपे व्यायाम
3

Belly Fat: सुटलेले पोट होईल फ्लॅट! जिमचीही गरज नाही, घरीच करा ‘हे’ सोपे व्यायाम

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या वेळी करावे कॉफीचे सेवन? जाणून घ्या ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे आणि नियम
4

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या वेळी करावे कॉफीचे सेवन? जाणून घ्या ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे आणि नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.