जायफळचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे
थंडीच्या दिवसांमध्ये हाडांचे दुखणे वाढू लागते. याशिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये आहारात शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आहारात बदल करून उष्ण पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. भारतीय स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मसाले उपलब्ध असतात. त्यात प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जायफळ. नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेले जायफळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. गोड पदार्थ बनवल्यानंतर त्यात जायफळ पावडर टाकली जाते. यामुळे पदार्थाची चव वाढण्यासोबतच सुगंध वाढण्यास सुद्धा मदत होते.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आहारात जायफळाच्या पावडरचा वापर करावा. त्यामुळे तुम्ही रात्री झोपण्याआधी अर्धा चमचा जायफळ पावडर दुधात मिक्स करून पिऊ शकता. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील.पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत अनेक ठिकाणी जायफळचा वापर केला जात आहे. जायफळमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात.आज आम्ही तुम्हाला आहारात जायफळ पावडरचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
अनेकांना कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा रात्रीच्या वेळी लवकर झोप लागत नाही. सतत शरीरामध्ये शारीरिक आणि मानसिक तणाव जाणवू लागतो. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी दुधामध्ये चिमूटभर जायफळ पावडर टाकून सेवन करावे. यामुळे मेंदू शांत राहतो आणि मानसिक तणाव कमी होतो. जायफळामध्ये नैसर्गिक सेंद्रिय घटक आढळून येतात, ज्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते.
खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर पचनक्रिया बिघडू लागते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात जायफळचे सेवन करावे. यासाठी एक ग्लास दुधात चिमूटभर पावडर टाकून मिक्स करा आणि रात्रीच्या वेळी सेवन करा. यामुळे पचनक्रिया सुधारून अपचन, गॅस आणि ऍसिडिटीची समस्या उद्भवणार नाही. जायफळचे दूध प्यायल्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी जायफळचे दूध प्यावे.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात जायफळच्या दुधाचे सेवन करावे. हे दूध आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.