Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

थायरॉईड झाल्यानंतर महिलांमध्ये अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया थायरॉईड म्हणजे काय आणि लक्षणे?

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 24, 2026 | 05:30 AM
Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात 'हे' मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात 'हे' मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

Follow Us
Close
Follow Us:

हायपरथायरॉईडमध्ये म्हणजे काय?
थायरॉईड झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
थायरॉईड म्हणजे काय?

कामाच्या धावपळीमध्ये महिला स्वतःच्या आरोग्याची अजिबात काळजी घेत नाही. सतत काम आणि कौटुंबिक जबाबऱ्यांमध्ये संपूर्ण दिवस निघून जातो. महिलांमध्ये दिसून येणारा गंभीर आजार म्हणजे थायरॉईड. हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. पण बऱ्याचदा शरीरात होणाऱ्या बदलांकडे महिला दुर्लक्ष करतात. वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. हेच छोटे आजार गंभीर रूप घेतात आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून टाकतात. थायरॉईडची समस्या वाढल्यानंतर घशात वेदना, कामात लक्ष न लागणे आणि शरीरातील हार्मोन्सच्या पातळीमध्ये अनेक बदल दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला थायरॉईड म्हणजे काय? थायरॉईड झाल्यानंतर महिलांच्या शरीरात कोणती लक्षणे दिसतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

1 दिवसात किती किलोमीटर चालायला हवं? रोज चालण्याचे तुफान फायदे

थायरॉईड म्हणजे काय:

थायरॉईड प्रामुख्याने घशात होतो. थायरॉईडची फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते. ती प्रामुख्याने गळ्यात असते. शरीराच्या मेटाबॉलिज्मला कंट्रोल करण्यासाठी हार्मोन तयार होतात. पण काहीवेळा शरीरात होणाऱ्या बदलांमुळे ही ग्रंथी कमी जास्त हार्मोन तयार करते, ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. सुरुवातीच्या दिवसांमध्ये थायरॉईडची अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात, पण कालांतराने लक्षणांमध्ये वाढ होते आणि संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते.

थायरॉईडची लक्षणे:

थायरॉईड झाल्यानंतर काहींचे वजन वाढते तर काहींचे वजन अचानक कमी होऊन जाते. हायपोथायरॉयडिज्ममध्ये मेटाबॉलिज्म स्लो होते, ज्याच्या परिणामामुळे वजन झपाट्याने वाढते. तर हायपरथायरॉयडिज्ममध्ये मेटाबॉलिज्म बूस्ट होते, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होऊन जाते. याशिवाय शरीरास आवश्यक असलेली झोप घेतल्यानंतर सुद्धा शरीरात खूप जास्त थकवा जाणवू लागतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

हायपोथायरॉईडमध्ये शरीराच्या ऊर्जा उत्पादनावर परिणाम दिसून येतो. यामुळे कायमच सुस्तपणा जाणवणे, थकल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. पण हायपरथायरॉईडमध्ये अस्वस्थता आणि कमी झोपेमुळे कमजोरी येण्याची जास्त शक्यता असते. कितीही झोपले तरीसुद्धा झोप पूर्ण झाल्यासारखी अजिबात वाटत नाही. वारंवार तुमच्या शरीरात ही लक्षणे दिसू लागल्यास वेळीच योग्य त्या चाचण्या करून उपचार करावेत.

रक्तात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी आहारात करा बदल

थायरॉईड झाल्यानंतर केस आणि त्वचेवर सुद्धा परिणाम दिसू लागतो. हायपोथायरॉईडमध्ये केस पातळ आणि रखरखीत होतात. तर त्वचा खूप जास्त कोरडी आणि सुकल्यासारखी वाटते. तसेच हायपरथायरॉईडमध्ये केसांची मूळ कमकुवत होऊन जातात. केसांच्या गुणवत्तेमध्ये बदल झाल्यानंतर केसांच्या बऱ्याच समस्या उद्भवू लागतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: थायरॉईडची प्रमुख लक्षणे?

    Ans: सतत आळस येणे, स्नायू कमकुवत होणे आणि सांधेदुखी

  • Que: थायरॉईड कशामुळे होतो?

    Ans: थायरॉईड ग्रंथीमध्ये बिघाड झाल्यामुळे हायपोथायरॉईडिझम (कमी हॉर्मोन्स) किंवा हायपरथायरॉईडिझम (जास्त हॉर्मोन्स) होतो

  • Que: थायरॉईड समस्येची प्रमुख कारणे:

    Ans: हाशिमोटोचा थायरॉइडायटिसमध्ये रोगप्रतिकारक शक्ती थायरॉईडवर हल्ला करते, ज्यामुळे हायपोथायरॉईडिझम होतो. ग्रेव्हस रोगामुळे हायपरथायरॉईडिझम होतो.

Web Title: These big changes are seen in womens body after thyroid recognize the danger in time and get proper treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • thyroid care
  • women health

संबंधित बातम्या

शरीराच्या ‘या’ अवयवांमध्ये वाढलेल्या वेदना सामान्य नसून आरोग्यासंबंधित उद्भवतात गंभीर संकट, वाढवतील आयुष्यभराचा त्रास
1

शरीराच्या ‘या’ अवयवांमध्ये वाढलेल्या वेदना सामान्य नसून आरोग्यासंबंधित उद्भवतात गंभीर संकट, वाढवतील आयुष्यभराचा त्रास

World Parkinson’s Day: केईएममध्ये आठवड्याला १० पार्किन्सन रुग्ण! डीबीएसने उपचारांना नवी आशा
2

World Parkinson’s Day: केईएममध्ये आठवड्याला १० पार्किन्सन रुग्ण! डीबीएसने उपचारांना नवी आशा

स्वयंपाक घरातील मसाल्यांच्या किमतींमध्ये का होत आहे वाढ? जाणून घ्या सोन्यापेक्षा महाग असलेल्या मसाल्यांची नावे
3

स्वयंपाक घरातील मसाल्यांच्या किमतींमध्ये का होत आहे वाढ? जाणून घ्या सोन्यापेक्षा महाग असलेल्या मसाल्यांची नावे

अचानक चक्कर येऊन गरगरल्यासारखं वाटत? थकवा नसून असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, वेळीच व्हा सावध
4

अचानक चक्कर येऊन गरगरल्यासारखं वाटत? थकवा नसून असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, वेळीच व्हा सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.