Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Tips :डार्क स्पॉटमुळे खराब झालेला चेहरा उजळ्वण्यासाठी लिंबाच्या रसात मिक्स करा ‘हे’ प्रभावी पदार्थ, त्वचा होईल सुंदर

चेहऱ्यावर आलेले डार्क स्पॉट त्वचेचे सौंदर्य कमी करून टाकतात. याशिवाय त्वचा निस्तेज दिसू लागते. आज आम्ही तुम्हाला लिंबामध्ये कोणते पदार्थ मिक्स करून त्वचेला लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 20, 2025 | 03:44 PM
डार्क स्पॉटमुळे खराब झालेला चेहरा उजळ्वण्यासाठी लिंबाच्या रसात मिक्स करा 'हे' प्रभावी पदार्थ

डार्क स्पॉटमुळे खराब झालेला चेहरा उजळ्वण्यासाठी लिंबाच्या रसात मिक्स करा 'हे' प्रभावी पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र चेहऱ्यावर आलेले काळे डाग त्वचा निस्तेज करून टाकतात. पोट स्वच्छ न झाल्यामुळे किंवा शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येऊ लागतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स नखांनी फोडल्यानंतर त्वचेवर काळे डाग तसेच राहतात. त्यामुळे त्वचेवर आलेले डाग कधीच फोडू नये. त्वचेवर आलेल्या डागांमुळे त्वचेचे सौंदर्य कमी होऊन जाते. डार्क स्पॉट आल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम, फेशिअल इत्यादी अनेक गोष्टी करून घेतात. मात्र तरीसुद्धा त्वचेमध्ये कोणताच बदल दिसून येत नाही. त्वचेला बाहेरून पोषण देण्यापेक्षा आतून पोषण देणे जास्त गरजेचे आहे.(फोटो सौजन्य – iStock)

कोणत्या विटामिनच्या कमतरतेने येऊ शकते कवळी लावायची वेळ, बत्तिशी गायब होण्याआधी जाणून घ्या दातांची काळजी

चेहऱ्यावर आलेले डार्क स्पॉट घालवण्यासाठी केमिकल उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करू शकता. लिंबाचा वापर करून त्वचेवरील डार्क स्पॉट कमी होतील. लिंबामध्ये असलेले गुणधर्म त्वचा उजळ्वण्यासाठी मदत करतात. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता आणि पोत सुधारते. लिंबाच्या रसामध्ये विटामिन सी आणि सायट्रिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात आढळून येते. सायट्रिक अ‍ॅसिड आणि विटामिन सी मुळे चेहऱ्यावर आलेले डार्क स्पॉट कमी होतात आणि त्वचा अतिशय सुंदर दिसते. आज आम्ही तुम्हाला डार्क स्पॉट घालवण्यासाठी लिंबाच्या रसात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

लिंबू आणि दही:

चेहऱ्यावर आलेले डार्क स्पॉट घालवण्यासाठी लिंबाचा रस आणि दह्याचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात दही टाका. सर्व साहित्य मिक्स करून संपूर्ण त्वचेवर लावून ठेवा. 15 मिनिटं ठेवल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या त्वचेवर आलेले डाग कमी होतील आणि त्वचा स्वच्छ दिसेल. दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड आढळून येते, तर लिंबामध्ये सायट्रिक अ‍ॅसिड आढळून येते. हा उपाय नियमित केल्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग कायमचे निघून जातील.

लिंबू आणि मध:

मधाचा वापर त्वचेवर आलेले डाग घालवण्यासाठी आणि इतर अनेक कारणासाठी केला जातो. मधामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा उजळदार होते. त्वचेवरील डाग कायमचे निघून जातात आणि त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसू लागते. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस आणि मध घेऊन मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून 15 मिनिटं तसेच ठेवा. 15 मिनिटांनी पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास काही दिवसांमध्येच फरक दिसून येईल.

चेहऱ्यासह ‘या’ अवयवांना स्क्रबिंग करणे आवश्यक! अन्यथा तारुण्यात येईल म्हातारपण, त्वचा होईल निस्तेज

लिंबू आणि कोरफड:

मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडचा वापर केला जात आहे. कोरफडचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक हायड्रेट आणि फ्रेश दिसते. वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून 10 मिनिटं ठेवून द्या. त्वचा कोरडी झाल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास त्वचेवरील डाग कमी होतील

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Mix this ingredient with lemon juice to remove dark spots and brighten your skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • Skin Care

संबंधित बातम्या

चिमूटभर केशर नियमित खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, आरोग्यासह त्वचा राहील कायमच ग्लोइंग
1

चिमूटभर केशर नियमित खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, आरोग्यासह त्वचा राहील कायमच ग्लोइंग

रात्रभर Aloe Vera Gel चेहऱ्यावर लावल्यास त्वचेमध्ये दिसून येतील आश्चर्यकारक बदल, त्वचा राहील हायड्रेट
2

रात्रभर Aloe Vera Gel चेहऱ्यावर लावल्यास त्वचेमध्ये दिसून येतील आश्चर्यकारक बदल, त्वचा राहील हायड्रेट

चेहऱ्यावर येईल डायमंड फेशियलचा ग्लो! ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा कच्चे दूध, नवरात्रीमध्ये दिसाल सुंदर
3

चेहऱ्यावर येईल डायमंड फेशियलचा ग्लो! ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा कच्चे दूध, नवरात्रीमध्ये दिसाल सुंदर

मधमाशांच्या पोळ्यांनी हैराण झालात? मग हा 1 रुपयांचा रामबाण उपाय करेल तुमची मदत; क्षणातच सर्व मधमाशा स्वतःच जातील पळून
4

मधमाशांच्या पोळ्यांनी हैराण झालात? मग हा 1 रुपयांचा रामबाण उपाय करेल तुमची मदत; क्षणातच सर्व मधमाशा स्वतःच जातील पळून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.