चेहऱ्यासह 'या' अवयवांना स्क्रबिंग करणे आवश्यक
सर्वच महिला सुंदर आणि तेजस्वी त्वचेसाठी सतत काहींना काही करत असतात. कधी फेशिअल करून घेतले जाते तर कधी बाजारात उपलब्ध झालेल्या महागड्या क्रिम्सचा वापर केला जातो. त्वचा गोरीपान करण्यासाठी अनेक महिला महागड्या स्किन ब्राइटनिंग क्रीमचा वापर करतात. मात्र या क्रीममध्ये असलेले हानिकारक केमिकल त्वचेचे पूर्णपणे नुकसान करून टाकतो. त्यामुळे कोणत्याही क्रीम किंवा फेशिअल, क्लीनअप करताना त्वचेला सूट होईल की नाही याचा व्यवस्थित विचार करावा, त्यानंतरच क्रीम वापरावे. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिन्यातून एकदा त्वचा स्क्रब करतात. याशिवाय त्वचा ग्लोइंग दिसण्यासाठी महागतले फेशिअल करून घेतले जाते.(फोटो सौजन्य – iStock)
फेशिअल ऑईलच्या मदतीने वयाच्या ५० व्या वर्षात त्वचेवर आणा चमकदार ग्लो! सुरकुत्या होतील गायब
ऊन, प्रदूषण, धूळ, माती इत्यादी अनेक गोष्टींमुळे त्वचेवर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. त्वचेवर जमा झालेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी महिला स्क्रबिंग करून घेतात. स्क्रबिंग केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. चेहऱ्यशिवाय शरीरातील इतर अवयव सुद्धा स्क्रब करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरातील कोणत्या अवयवनांवर स्क्रब केल्यामुळे तारुण्यात वाढ होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
थंडीच्या दिवसांमध्ये ओठ अतिशय कोरडे होऊन जातात. कोरड्या ओठांकडे महिला फारशा लक्ष देत नाही. कोरड्या ओठांची योग्य काळजी न घेतल्यामुळे ओठ पूर्णपणे खराब होऊन जातात. ओठ कोरडे झाल्यानंतर ओठांना भेगा पडणे, ओठांमधून रक्त येणे, कोरड्या ओठांची त्वचा निघणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओठांवर स्क्रबिंग करणे आवश्यक आहे. स्क्रबिंग केल्यामुळे ओठांवरील कोरडी त्वचा निघून जाते आणि गुलाबी आणि सुंदर दिसतात. मात्र स्क्रबिंग करताना ओठांची त्वचा जास्त पातळ असल्यामुळे हलक्या हाताने स्क्रब करावे.
उन्हात बाहेर फिरल्यानंतर किंवा इतर वेळी सूर्यकिरणांच्या प्रकाशात गेल्यामुळे हातांवरील त्वचा काळवंडून जाते. हात काळे आणि निस्तेज दिसू लागतात. त्यामुळे दर आठवड्यातून एकदा हातांचे स्क्रबिंग करणे आवश्यक आहे. स्क्रबिंग केल्यामुळे हातांची त्वचा मुलायम, चमकदार आणि एकसमान स्किन टोन दिसून येतो. स्क्रबिंग केल्यामुळे हातांची त्वचा कोमट पाण्याने धुवावी.
पायांच्या त्वचेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे पायांची त्वचा निस्तेज आणि काळी पडून जाते. याशिवाय पायांवर वाढलेले अनावश्यक केस पायांचे सौदंर्य कमी करतात. त्यामुळे पायांचे सौदंर्य वाढवण्यासाठी स्क्रबिंग करणे आवश्यक आहे. यामुळे पायांची त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसू लागते. वॅक्सिंगमुळे त्वचेवर आलेली पुरळ कमी करण्यासाठी स्क्रबिंग करणे आवश्यक आहे.