मोदक बनवण्यासाठी वापरलेली सर्व सामग्री आरोग्यासाठी लाभदायक आहे. जसे यात वापरले जाणारे तूप बध्दकोष्ठतेवर लाभदायी असते. सारणात वापरले जाणारे ओले खोबरे आणि गूळ, वेलची हे फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. पचनासाठी उपयुक्त असते. मोदका खाल्याने भुक कमी लागते.
यासोबतच तूपात व्हिटॅमिन ए, ओमेगा ३ फॅटी उत्तम स्रोत आहे. मोदकात तांदळाची पिठी वापरली जाते. यात कॅल्शियम असते. कोलिन असते, ज्यामुळे लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखले जाते. मोदक पचनास उपयुक्त, कार्डियोव्हॅस्कूलर, लिव्हर आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.