Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यातील दूषित पाणी शरीरासाठी ठरेल जीवघेणे! आजारांपासून बचाव करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा पाण्याचे सेवन

पावसाळ्यातील आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नेहमीच गरम केलेले पाणी प्यावे. कारण दूषित पाणी प्यायल्यामुळे विषाणू थेट शरीरात प्रवेश करतात, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 04, 2026 | 05:30 AM
पावसाळ्यातील दूषित पाणी शरीरासाठी ठरेल जीवघेणे! आजारांपासून बचाव करण्यासाठी 'या' पद्धतीने करा पाण्याचे सेवन

पावसाळ्यातील दूषित पाणी शरीरासाठी ठरेल जीवघेणे! आजारांपासून बचाव करण्यासाठी 'या' पद्धतीने करा पाण्याचे सेवन

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी?
पावसाळ्यात दूषित पाण्याचे सेवन केल्यास उद्भवणाऱ्या समस्या:
दूषित पाण्यामुळे होणारे आजार:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराची काळजी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. कारण या दिवसांमध्ये रोगराई वेगाने वाढते. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी खड्यांमध्ये पाणी साचून राहते. साचून राहिलेल्या पाण्यात हानिकारक विषाणू मोठ्या प्रमाणावर वाढतात. तसेच उघड्यावरील अन्नपदार्थ किंवा पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला धोका निर्माण होतो. दूषित पाण्याच्या सेवनामुळे उलट्या, जुलाब आणि फूड पॉयजनिंग होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पिणे फार आवश्यक आहे. पाण्याची योग्य साठवणूक आणि स्वच्छता सुद्धा अत्यंत महत्वाची ठरते. थोड्याशा निष्काळजीपणामुळे जीवाला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात दूषित पाण्याचे सेवन केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

Heart Health: फिट हार्ट, हेल्दी लाइफ! रोजच्या जीवनातील ‘या’ सवयी हृदयासाठी ठरतील वरदान

पावसाळ्यात दूषित पाण्याचे सेवन केल्यास उद्भवणाऱ्या समस्या:

उघड्यावरील किंवा दूषित पाण्याचे सेवन केल्यामुळे जीवाणू आणि विषाणू आतड्यांना संक्रमित करतात. यामुळे पातळ शौचास होणे, उलट्या, मळमळ आणि पोट खराब होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. वारंवार जुलाब झाल्यामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता निर्माण होते, ज्याच्या परिणामामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढतो. दूषित पाणी प्यायल्यामुळे थेट पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे यामुळे तीव्र पोटदुखी, गॅस होणे, पोट फुगणे, पोटात गोळे येणे, अपचन आणि भूक न लागणे यांसारखी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात.

सतत होणाऱ्या उलट्या आणि जुलाबांमुळे शरीरातील आवश्यक घटक बाहेर पडून जातात. ज्याच्या परिणामामुळे जास्त तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, चक्कर येणे, अशक्तपणा, डोळे खोल जाणे आणि लघवी कमी होणे, गडद पिवळी होणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. पण तरीसुद्धा अनेक लोक शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे आजार आणखीनच वाढून आरोग्य बिघडते.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार:

कॉलरा झाल्यानंतर पातळ जुलाब आणि तीव्र निर्जलीकरण होते.
टायफॉइड झाल्यानंतर दीर्घकाळ उच्च ताप, पोटदुखी आणि अशक्तपणा येतो
हिपॅटायटीस ए : यकृताचा संसर्ग ज्यामुळे कावीळ, ताप, उलट्या आणि थकवा येण्याची शक्यता असते.

थोडं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात जडपणा किंवा गॅस झाल्यासारखे वाटते? दैनंदिन जीवनशैलीतील ‘या’ सवयींमुळे वाढतो अपचनाचा त्रास

पावसाळ्यात पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी:

पावसाळ्यात रस्त्यावरील उघडे पाणी अजिबात पिऊ नये. पाणी १ ते २ मिनिट व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर गरम केलेले पाणी थंड करून नंतरच प्यावे. घरामध्ये पाणी स्वच्छ करण्यासाठी आरओ, यूव्ही किंवा प्रमाणित चांगले वॉटर फिल्टरचा वापर करावा. घरातील पाण्याची टाकी स्वच्छ करून घ्यावी. कारण महिनाभर पाण्याची टाकी स्वच्छ न केल्यास त्यातील हानिकारक विषाणू पोटात जाण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पावसाळ्यात दूषित पाणी पिण्यामुळे कोणते आजार होऊ शकतात?

    Ans: दूषित पाणी पिल्याने टायफॉईड, कॉलरा, अतिसार, कावीळ (हेपेटायटिस A आणि E), गॅस्ट्रोएन्टेरायटिस यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.

  • Que: पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे?

    Ans: पाणी उकळून किंवा प्रमाणित वॉटर फिल्टरद्वारे शुद्ध करून पिणे, स्वच्छ व झाकलेल्या भांड्यात साठवणे आणि पाणी काढताना स्वच्छ भांडे वापरणे आवश्यक आहे.

  • Que: पावसाळ्यात बाहेरचे पाणी पिणे सुरक्षित आहे का?

    Ans: शक्यतो रस्त्यावरील किंवा स्वच्छतेची खात्री नसलेल्या ठिकाणचे पाणी पिणे टाळावे. सीलबंद बाटलीबंद पाणी किंवा शुद्ध केलेले पाणीच पिणे अधिक सुरक्षित ठरते.

Web Title: Monsoon contaminated water can be dangerous follow these safe drinking practices to prevent waterborne diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Drinking Water
  • Health Care Tips
  • monsoon care

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.