Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi Food: होळीसाठी बनवा खास मसालेदार बटाटा सारणासह डाळ कचोरी, स्पेशल मेन्यू

होळीमध्ये पुरणपोळी तर असतेच पण अनेक ठिकाणी कचोरीचाही स्वाद घेतला जातो. यावर्षी तुम्ही बटाट्याच्या मसालेदार सारणासह घरीच बनवा कचोरी आणि सर्वांचा आनंद करा द्विगुणित, खाऊन व्हा खुष

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 12, 2025 | 04:54 PM
होळीसाठी बनवा खास कचोरी शेफने दिल्या टिप्स

होळीसाठी बनवा खास कचोरी शेफने दिल्या टिप्स

Follow Us
Close
Follow Us:

‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ हे तर परंपरागत आपण कायम ऐकत आलो आहोत आणि नेहमची परंपरेनुसार होळीच्या दिवशी पुरणाच्या पोळीची मजा घेत आलोय. पण होळीच्या या सणासाठी अनेक पदार्थ आपल्या भारतात बनवले जातात आणि उत्तरेकडे कचोरी खाणे हादेखील एक पर्याय होळीच्या दिवशी निवडला जातो. आपल्याला कचोरी म्हणजे स्वीट्स मार्टमधून विकत आणून खाणे हाच एक पर्याय माहीत आहे. 

मात्र यावर्षी तुम्ही होळीच्या दिवशी घरच्या घरीही कचोरी तयार करून आपल्या घरच्यांना सुखद धक्का देऊ शकता. होळीच्या दिवशी तुम्ही मूगडाळीची कचोरी बटाट्याच्या सारणासह बनवा आणि सर्वांची वाहवा मिळवा. यासाठी शेफ दीपक गोरे, इन हाऊस कलिनरी शेफ, टाटा संपन्न, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड (TCPL) यांनी साहित्य आणि विधी दिला आहे. मग वाट कसली पाहताय लागा लगेच तयारीला आणि करा साहित्याची ऑर्डर 

साहित्य

कचोरीसाठी पीठ:

  • मैदा – 2 कप
  • ऑरगॅनिक इंडिया तूप – 4 टेबलस्पून
  • टाटा मीठ – ½ टीस्पून
  • पाणी – ¾ कप
प्रयागराजची प्रसिद्ध खस्ता कचोरी आता घरीच बनवा, संध्याकाळचा नाश्ता होईल आणखीनच खास

सारणासाठी:

  • टाटा संपन्न मूग डाळ (तुरीट) – 25 ग्रॅम
  • टाटा संपन्न उडीद डाळ – 25 ग्रॅम
  • डाळ भिजवण्यासाठी – आवश्यकतेनुसार पाणी
  • ऑरगॅनिक इंडिया तूप – 4 टेबलस्पून
  • टाटा संपन्न बडीशेप – 1 टीस्पून
  • टाटा संपन्न जिरे – 1 टीस्पून
  • टाटा संपन्न धणे – 1 ½ टेबलस्पून
  • टाटा संपन्न हिंग – ¼ टीस्पून
  • टाटा संपन्न हळद – ¼ टीस्पून
  • टाटा संपन्न काश्मीरी लाल तिखट – 2 ½ टीस्पून
  • टाटा संपन्न धणे पावडर – 1 टेबलस्पून
  • टाटा संपन्न गरम मसाला – 1 टीस्पून
  • टाटा संपन्न चाट मसाला – 1 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • टाटा संपन्न बारीक बेसन – ¼ कप
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची – 2 लहान
  • उकडून सोललेला आणि मॅश केलेला बटाटा – 2 मध्यम आकाराचे
संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा बटाटयाची खुसखुशीत कचोरी, झटपट रेसिपी नोट करा

कशी आहे कृती

अशी बनवा कचोरी

कचोरीसाठी सारण:

  • एका भांड्यात मूंग डाळ आणि उडीद डाळ 2 तास भिजत ठेवा. पाणी काढून मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्या आणि बाजूला ठेवा
  • कढईत ऑरगॅनिक इंडिया तूप गरम करून त्यात बडीशेप, जिरे, धणे आणि हिंग घालून मंद आचेवर परतून सुगंध येऊ द्या
  • हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ घालून मंद आचेवर परता
  • त्यात बेसन टाकून मंद आचेवर भाजा जोपर्यंत बेसनला छान सुगंध येत नाही
  • आता वाटलेली डाळ आणि मॅश केलेला बटाटा घालून नीट मिक्स करून ५ मिनिटे शिजवा. मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या
कचोरीसाठी पीठ:
  • एका मोठ्या भांड्यात मैदा, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यात तूप टाकून चांगले चोळून घ्या, जेणेकरून पीठ ओलसर वाटेल
  • पाणी घालून मऊ आणि नरम पीठ मळून घ्या
  • पीठाला तेलाचा हलका हात लावून ३० मिनिटे झाकून ठेवा
कचोरी भरणे आणि तळणे :
  • पीठाचा लहान गोळा घेऊन हाताने मळून घ्या आणि हलक्या हाताने लाटून घ्या
  • त्यात तयार केलेले मसालेदार बटाटा-डाळ सारण ठेवा. पीठाची कड बाजूने गोळा करून नीट बंद करा आणि हलक्या हाताने लाटून घ्या
  • तेल गरम करून मंद आचेवर कचोरी तळायला ठेवा. कचोरी आपोआप वर यायला ३ मिनिटे लागतात, तोपर्यंत हलवू नका
  • नंतर हलक्या हाताने उलटा-पलटी करून दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा
  • कचोरी टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निघू द्या
  • मूगडाळ कचोरी तयार! चिंचेच्या चटणी, गोड दही, तिखट पुदिना चटणी आणि शेव सोबत सर्व्ह करा
होळीसाठी काय करायचं हे कळत नसेल तर हा लेख नक्कीच तुमची मदत करेल. यावर्षी खुसखुशीत आणि चविष्ट अशी कचोरी तुमची होळी करेल अधिक मजेशीर!

Web Title: Moong dal kachori with mashed potato recipe for holi special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • food recipe
  • holi
  • Holi 2025
  • Kachori recipe

संबंधित बातम्या

संध्याकाळचा चहा होईल आणखीनच मजेदार! नाश्त्यासाठी झटपट बनवा फ्राइड पोटॅटो चाट, नोट करून घ्या रेसिपी
1

संध्याकाळचा चहा होईल आणखीनच मजेदार! नाश्त्यासाठी झटपट बनवा फ्राइड पोटॅटो चाट, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा पारंपरिक ताकातला बटाटा, एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा होईल भाजी खाण्याची इच्छा
2

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा पारंपरिक ताकातला बटाटा, एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा होईल भाजी खाण्याची इच्छा

साखरेचा पाक किंवा माव्याचा वापर न करता घरीच बनवा चविष्ट नारळाचे लाडू, मिठाईवाल्यांसारखी लागेल चव
3

साखरेचा पाक किंवा माव्याचा वापर न करता घरीच बनवा चविष्ट नारळाचे लाडू, मिठाईवाल्यांसारखी लागेल चव

साधे पाव खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत ठेचा पाव, वाढेल जिभेची चव
4

साधे पाव खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत ठेचा पाव, वाढेल जिभेची चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.