Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोपतून उठताच मोबाईल चालवताय? मग सावधान… सकाळच्या या सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

Morning Habits Increase Hear Attack : सकाळच्या वेळेत नकळत आपल्याकडून काही अशा चुका घडतात ज्या हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात. भारतात दररोज हजारो लोक या आजारामुळे मृत पावले असून वेळीच आपल्या सवयीत बदल करणे महत्त्वाचे ठरते

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 28, 2026 | 08:15 PM
झोपतून उठताच मोबाईल चालवताय? मग सावधान... सकाळच्या या सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

झोपतून उठताच मोबाईल चालवताय? मग सावधान... सकाळच्या या सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

Follow Us
Follow Us:
  • देशात हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत असून याविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे.
  • रोजच्या काही सवयी हृदयावरील ताण वाढवत असतात.
  • या सवयी वेळीच बदलल्यास आपण स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो.
हृदयाचे रोग आता फक्त वृद्ध लोकांपर्यंतच मर्यादित राहिले नसून तरुणांनाही याचा त्रास जाणवू लागला आहे. चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार, तणाव आणि अपुरी झोप यामुळे लोकांमध्ये हार्ट अटॅकच्या घटना फार वाढल्या आहेत. भारतात हृदयविकाराच्या घटना वेगाने वाढत असून जागतिक हृदयविकाराच्या मृत्यूंपैकी २०% वाटा भारताचा आहे. एका अहवालानुसार, भारतात रोज १७५ लोकांच्या हार्ट अटॅकने मृत्यू होतो. अशात आपल्या आरोग्याची आपण जास्त काळजी घ्यायला हवी.

Budget Travel : अंदमान-मनालीची मजा आता फक्त अर्ध्या खर्चात… हे 5 सिक्रेट स्पॉट आहेत फिरण्यासाठी परफेक्ट

सकाळची वेळ आपल्या हृदयासाठी खूप संवेदनशील मानली जाते. खरंतर या काळात रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नैसर्गिकरित्या वाढतात ज्यामुळे हृदयावर ताम येऊ लागतो. अशात सकाळच्या वेळी केलेल्या काही साध्या चुकाही आपल्या हृदयावरील दबाव वाढवू शकतात ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. बऱ्याचदा या सामान्य सवयी आपल्याला मोठ्या वाटत नाहीत पण यांचा पुढे जाऊन आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. चला सकाळच्या वेळी केलेल्या कोणत्या चुका हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात ते तज्ञांकडून जाणून घेऊया.

बेडवरुन अचानक उठणे

डॉ. अमर सिंघल यांच्या मते, अनेकजण बिछाण्याजवळ अलार्म सेट करुन झोपतात आणि अलार्म वाजताच ते एका झटक्यात उठतात. तथापि, झोपेतून उठल्यानंतर सामान्य स्थितीत येण्यासाठी शरीराला थोड्या वेळेची गरज असते. अचानक झोपेतून उठून उभे राह्ल्याने रक्तदाब वाढू शकतो, चक्कर येऊ शकते, अस्वस्थता आणि हृदयावरील ताण वाढू शकतो. यामुळेच तज्ञांच्या सल्ल्यानुसार, कधीही झोपेतून उठल्यानंतर किमान १ मिनिटे बिछान्यावर बसून रहावे आणि मग हळूच उठून दिवसाची सुरुवात करावी.

सकाळी उठताच मोबाईल वापरणे

अनेकांना सकाळी उठताच तोंडासमोर स्मार्टफोन उघडण्याची फार सवय आहे. लोक आधी आंघोळ किंवा ब्रश करत नाही कर स्मार्टफोनवर रिल्स स्क्रोल करु लागतात. तुम्हालाही ही सवय असल्याच वेळीच ती मोडा. झोपेतून उठताच स्मार्टफोन वापरल्याने मेंदूवरील दाब वाढतो आणि मानसिक तणाव निर्माण होऊ लागतो. यामुळे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर देखील वाढू लागते. ही सवय लगेच तुमच्या शरीरावर परिणाम करणार नाही पण हळूहळू तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करेल.

रिकाम्या पोटी काॅफी किंवा चहाचे सेवन

अनेकांना सकाळी उठताच काॅफी किंवा चहाचे सेवन करण्याची सवय आहे. सकाळी चहा किंवा काॅफी पिण्यात काही गैर नाही पण याआधी आपण पोटभर नाश्ता करायला हवा. रिकाम्या पोटी चहा किंवा काॅफीचे सेवन हाय ब्लड प्रेशर, हृदयरोगाचा धोका वाढवते. तुम्हाला दररोज काॅफी किंवा चहा पिण्याची सवय असल्यास सर्वात आधी सकाळी पाणी प्या, मग नाश्ता करा आणि मग काॅफी किंवा चहाचे सेवन करा.

Reliance Foundation Hospital : एका दिवसात ६ रुग्णांना नवे जीवन; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचा अभिमानास्पद विक्रम

उठताच जड व्यायाम करणे

व्यायाम आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा असतो पण दिवसाच्या सुरुवातीलाच हेवी वर्कआउट नाही तर वार्म-अप एक्सरसाइज करावी. सकाळच्या वेळी शरीर आणि स्नायू पूर्णपणे सक्रिय नसतात ज्यामुळे जोरात धावणे, हेवी वेटलिफ्टिंग करणे किंवा अतिताणाचे व्यायाम करणे यामुळे हृदयावरील ताण वाढू शकतो. तज्ञांनुसार, सुरुवातीला स्ट्रेंचिग आणि हलके कमी ताणाचे व्यायाम करावे.

Web Title: Morning habits that increase heart attack risk avoid these daily habits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • heart attack
  • lifestyle news

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
3

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

World Heart Day : हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या! ‘हे’ छुपे धोके तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
4

World Heart Day : हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या! ‘हे’ छुपे धोके तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.