Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या लोकांना काय कळणार कोकणातील शिमग्याची मजा! पालखीचा नाद अन् शंकासुराची भिती, अनोखा असतो उत्सवाचा थाट

कोकणातील शिमगा म्हणजे 10 दिवसाधीसपून सुरू होणारे होलिका दहन आणि त्यानंतर होम आणि पालखीची मजा. कोकणात गणेशोत्सव आणि होळी हे दोन्ही सण मोठ्या थाटात साजरे केला जातात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 12, 2025 | 01:23 PM
मुंबईच्या लोकांना काय कळणार कोकणातील शिमग्याची मजा! पालखीचा नाद अन् शंकासुराची भिती, अनोखा असतो उत्सवाचा थाट

मुंबईच्या लोकांना काय कळणार कोकणातील शिमग्याची मजा! पालखीचा नाद अन् शंकासुराची भिती, अनोखा असतो उत्सवाचा थाट

Follow Us
Close
Follow Us:

भारतात 13 मार्च रोजी होलिका दहन आणि 14 मार्च रोजी रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. भारतातील अनेक भागात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरात राहणारी लोक एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी करतात. पण होळी म्हटलं तर फक्त होलिका दहन आणि रंगपंचमी एवढेच आहे का? तर नाही. होळी खेळण्याची खरी मजा तर कोकणात येते. शहरातील लोकांना काय समजणार कोकणातील शिमग्याची मजा, असं बोलतात ते काही खोटं नाही.

होळीच्या रंगांमुळे केस खराब होऊन जातात? केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो, केस राहतील निरोगी

महाराष्ट्रातील कोकण भागात, होळीला “कोकणातील शिमगा” असे म्हणतात. हा एक उत्साही आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध सण आहे जो रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि गोव्याच्या काही भागात साजरा केला जातो. दहा ते पंधरा दिवसांच्या या उत्सवात होलिका दहन, रंगपंचमी आणि पालखी उत्सव यासारख्या परंपरांचा समावेश आहे. गणपती नंतर होळी हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे आणि हा उत्सव सुमारे पंधरा दिवस विविध पारंपारिक विधींसह साजरा केला जातो.  (फोटो सौजन्य – Instagram) 

हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याच्या पाचव्या दिवशी होलिक दहन केलं जातं जिथे आजूबाजूच्या पाच गावातील गावकरी गावाच्या मैदानावर आयोजित या उत्सवात सामील होतात. कोकणातील होळीचे प्रमुख आकर्षण म्हणजे संकासूर आणि पालखी. संकासूराच्या वेशात पेटलेल्या होळीच्या पाच फेऱ्या मारणारा आणि आगीतून धावणारा एक माणूस कोकणातील शिमग्याचे एक प्रमुख आकर्षण आहे. कोकणातील होळी उत्सवादरम्यान समाज आणि स्थानिक मंदिराच्या कल्याणासाठी देणग्या गोळा करण्यासाठी लोक ‘संकासूर’सारखे कपडे घालतात. ही कोकणातील पिढ्यानपिढ्या सुरु असलेली परंपरा आहे.

कोकणातील शिमगा म्हणजे 10 दिवसाआधीपासून सुरू होणारे होलिका दहन आणि त्यानंतर होम आणि पालखीची मजा. पालखी खांद्यावर घेऊन नाचण्याची मजा फक्त कोकणातच येते. खरं तर कोकणात होळीला एक वेगळाच उत्साह असतो. मुंबईतील चाकरमानी पालखीच स्वागत करण्यासाठी कोकणात जातात. सहा सहा महिने बंद असणारी घर होळीच्या निमित्ताने पुन्हा उघडली जातात. गावातील ओसाड शांतता आनंदी वातावरणात बदलते. अहो कोकणातील शिमग्याची गोष्टच वेगळी आहे.

गर्भाशयाचा कर्करोग झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणे, चुकूनही महिलांनी करू नका दुर्लक्ष

शिमग्याला पालखी खांद्यावर घेताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि उत्साह दिसतो तो कोणत्याही मौल्यवान दागिन्याशिवाय कमी नाही. कोकणातील शिमगा पाहण्यासाठी अगदी दुरून लोक कोकणात येतात. शिमग्याच्या निमित्तानं वर्षभर न भेटलेली मंडळी पुन्हा एकत्र येतात. एकमेकांना मिठी मारून होळीच्या शुभेच्छा देतात. होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून पालखी चाकरमान्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या घरी जाते. शिमग्याला कोकणातील माणसं गावी जातात कारण त्यांचा देव त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या घरी येतो. रात्री ज्या चारमान्याच्या घरी पालखी वस्तीला असेल त्या घरी सर्व गावकरी जमतात आणि रात्रभर मजा मस्ती करत भजन म्हणतात.

होळीचा सण म्हणजे केवळ रंग खेळणे किंवा गुलाल उधळणे एवढंच नसत, तर कोकणात जाऊन मानाची पालखी खांद्यावर घेऊन नाचावणं यात देखील एक वेगळाच आनंद असतो. कोकणातील प्रत्येक गावात प्रत्येक वाडीची मनाची पालखी असते. प्रत्येकजण त्यांच्या वेगळ्या अंदाजात आणि तालासुरात पालखी नाचवण्याचा आनंद घेतो. आणि अशा प्रकारे साजरा केला जातो कोकणातील शिमगा.

Web Title: Mumbai folks wont understand the joy of konkan shimga the rhythm of the palakhi and the fear of shankasur a unique festive spectacle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • holi
  • Holi 2025
  • kokan

संबंधित बातम्या

Raigad News: कोकणात वाढला थंडीचा जोर, तज्ज्ञांनी सांगितली हवामान बदलाची कारणं
1

Raigad News: कोकणात वाढला थंडीचा जोर, तज्ज्ञांनी सांगितली हवामान बदलाची कारणं

Horror Story: “आलात तुमच्या मर्जीने, जाणार माझ्या…!” भसाभसा खाऊ लागला मटण, असा घाट जो अस्तित्वातच नाही
2

Horror Story: “आलात तुमच्या मर्जीने, जाणार माझ्या…!” भसाभसा खाऊ लागला मटण, असा घाट जो अस्तित्वातच नाही

Horror Story: बस स्टँडवरून घराकडे जाताना दिसले ‘ते’ तिघं! झाडावर लटकून मागू लागले तंबाखू
3

Horror Story: बस स्टँडवरून घराकडे जाताना दिसले ‘ते’ तिघं! झाडावर लटकून मागू लागले तंबाखू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.