
एका रात्रीत उभारली गेली अशी भारतातील रहस्यमय मंदिरे, आजही भाविकांना चकित करतात यांच्या कथा
भारतातील अनोख मंदिर जेथील शिवलिंगाची संख्या नेहमी बदलत राहते, विज्ञानालाही ठाऊक नाही यामागच रहस्य
ककनमठ
मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्यापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर ककनमठ नावाचे एक प्राचीन शिव मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम कच्छवाहा वंशातील राजा कीर्ती सिंह यांच्या काळात झाले असल्याचे मानले जाते. स्थानिक कथेनुसार, हे मंदिर एका रात्रीत पूर्ण झाले. अशी श्रद्धा आहे की भगवान शंकरांच्या गणांनी, म्हणजेच दिव्य शक्तींनी किंवा भूतगणांनी, हे मंदिर उभारले. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची संपूर्ण रचना दगडांपासून तयार करण्यात आली आहे. हे दगड कोणत्याही सिमेंटशिवाय अशा पद्धतीने बसवले आहेत की त्यांच्यात अद्भुत संतुलन आहे. प्रचंड वादळे किंवा आंधी-तूफानही या दगडांना हलवू शकत नाहीत, हे पाहून आजही लोक आश्चर्यचकित होतात.
गोविंद देव जी
उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे गोविंद देव जी यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर पाहताना अनेकांना ते अपूर्ण असल्यासारखे वाटते. स्थानिक मान्यतेनुसार, या मंदिराचे बांधकामही एका रात्रीत झाले. असे सांगितले जाते की काही दिव्य शक्तींनी किंवा अलौकिक शक्तींनी एकत्र येऊन रातोरात हे मंदिर उभारले. मात्र, पहाटेच्या आधी कुणीतरी चक्की फिरवण्यास सुरुवात केली आणि त्या आवाजामुळे मंदिर उभारणाऱ्या शक्तींनी काम अर्धवट सोडून तेथून निघून गेले. त्यामुळे हे मंदिर आजही अपूर्ण अवस्थेत दिसते.
हथिया देवाल
उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात शिवाचे एक मंदिर आहे, ज्याला ‘हथिया देवाल’ असे म्हणतात. या मंदिराबाबत अशी कथा प्रचलित आहे की एका हाताच्या शिल्पकाराने हे मंदिर केवळ एका रात्रीत बांधले. रात्रीच्या अंधारात आणि घाईत काम पूर्ण करताना शिवलिंगाचे अरघ्य उलट दिशेने बनले. याच कारणामुळे येथे शिवलिंगाची नियमित पूजा केली जात नाही, असे मानले जाते. ही कथा या मंदिराला आणखी गूढ बनवते.
अनोखा टेलिफोन ‘बूथ’ जो मृत व्यक्तींशी संवाद साधतो… हे नेमकं आहे तरी कुठे? सविस्तर जाणून घ्या
भोजेश्वर मंदिर
मध्यप्रदेशची राजधानी भोपालपासून सुमारे 32 किलोमीटर अंतरावर भोजपूर येथे एका टेकडीवर भोजेश्वर मंदिर आहे. हे शिवमंदिर परमार वंशातील प्रसिद्ध राजा भोज यांनी बांधण्यास सुरुवात केली होती. हे मंदिर आजही अपूर्ण अवस्थेत आहे. मंदिर अपूर्ण का राहिले, याबाबत इतिहासात कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. मात्र, लोककथेनुसार हे मंदिर एका रात्रीत पूर्ण करायचे होते. छताचे काम सुरू असतानाच सकाळ झाली आणि त्यामुळे काम थांबवावे लागले. या मंदिराची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले विशाल शिवलिंग. एकाच दगडातून घडवलेले हे शिवलिंग जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक मानले जाते. या सर्व मंदिरांच्या कथा ऐकताना इतिहास, श्रद्धा आणि रहस्य यांचा अद्भुत संगम दिसून येतो. याच कारणामुळे ही मंदिरे आजही भाविकांसह इतिहासप्रेमींनाही आकर्षित करतात.