Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpanchami 2025 : पारंपरिक मिठाईने होईल सण साजरा; घरी बनवा गोडसर ‘पुरणाचे दिंड’

पुरणाच्या दिंडांसह सणासुदीचा गोडवा वाढवा! नागपंचमीनिमित्त आज आम्ही तुमच्यासाठी एका पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्याचे नाव आहे पुरणाचे दिंड. याचा मधुर सुगंध आणि गोडसर चव सर्वांनाच याकडे आकर्षित करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 23, 2025 | 09:51 AM
Nagpanchami 2025 : पारंपरिक मिठाईने होईल सण साजरा; घरी बनवा गोडसर 'पुरणाचे दिंड'

Nagpanchami 2025 : पारंपरिक मिठाईने होईल सण साजरा; घरी बनवा गोडसर 'पुरणाचे दिंड'

Follow Us
Follow Us:

श्रावण महिना लवकरच सुरु होणार आहे आणि यासह सुरु होणार आहेत सर्व सण! हा सण हिंदू धर्मात फार पवित्र महिना मानला जातो. श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी! हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून यादिवशी नागदेवताची पूजा करून त्याचा आशीर्वाद घेतला जातो. तसेच घरी गोडाधोडाचे जेवणही बनवले जाते.

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट लाल भोपळ्याचे भरीत, पावसाळ्यात पचनासाठी ठरेल अतिशय हलका पदार्थ

गणपती, नागपंचमी किंवा श्रावणातील शुभ मुहूर्तांवर बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक मिठाईंपैकी एक म्हणजे पुरणाचे दिंड. पुरणपोळीच्या थोड्या वेगळ्या आणि खास वाफवलेल्या या स्वरूपाला ‘दिंड’ म्हणतात. चविष्ट, पौष्टिक आणि सणासुदीच्या दिवशी नैवेद्याला योग्य असा हा गोड प्रकार अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने करता येतो. चला तर मग वेळ न घालवता यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य:

पुरणासाठी:

  • हरबरा डाळ – 1 कप
  • गूळ – ¾ कप
  • वेलची पूड – ½ टीस्पून
  • जायफळ पूड – ¼ टीस्पून
  • तूप – 1 टेबलस्पून
आवरणासाठी (कणिक):
  • तांदळाची पिठी – 1 कप
  • मीठ – चिमूटभर
  • तूप – 1 टीस्पून
  • गरम पाणी – गरजेनुसार
गटारी स्पेशल : स्टार्टर्सला ट्राय करा काहीतरी नवीन; घरी बनवा टेस्टी Sweet And Spicy Chicken

कृती:

  • पुरणाचे दिंड तयार करण्यासाठी सर्वप्रथम हरबरा डाळ स्वच्छ धुऊन 2 तास भिजवून ठेवा.
  • कुकरमध्ये डाळ 2-3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.
  • शिजलेली डाळ गाळा आणि पाणी वेगळं काढा (या पाण्यापासून तुम्ही तिखट सार तयार करू शकता).
  • डाळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळा, घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • त्यात वेलची पूड, जायफळ पूड व थोडं तूप घालून मिश्रण गार होऊ द्या.
    गार झाल्यावर छोटे गोळे तयार करा.
  • तांदळाची पिठी चाळून घ्या आणि मग त्यात चिमूटभर मीठ, 1 टीस्पून तूप आणि गरम पाणी टाकून मऊ पीठ मळा.
  • पीठ झाकून 20-25 मिनिटे झाकून ठेवा.
  • पीठाचे छोटे गोळे करून पुरीसारखे थोडेसे हाताने पसरवा.
  • त्यात एक पुरणाचा गोळा ठेवा आणि नीट बंद करून गोळा तयार करा.
  • हे गोळे थोडेसे हाताने थापून दाबा.
  • एका वाफवायच्या पात्रात केळीचे पान (किंवा तेल लावलेली प्लेट) ठेवा.
  • तयार केलेले दिंड त्यावर लावा, 10-15 मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या.
  • दिंड थोडं तुपासोबत गरम गरम सर्व्ह करा.
  • याचा मधुर सुगंध घरातील सर्वांनाच याकडे आकर्षित करेल आणि जो तो म्हणेल, ‘मग आज काय स्पेशल’.
  • तांदळाच्या पिठाचा वापर केल्यामुळे दिंड हलकी लागतात.
  • गूळ आणि डाळीचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही बदलू शकता.

Web Title: Nagpanchami 2025 make tasty and authentic puranache dind at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • nagpanchami news
  • sweet dish

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
2

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.