Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय

कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना सतावत आहे. यासाठी डाय किंवा केमिकलयुक्त उत्पादने वापरण्याऐवजी आहार आणि केसांच्या निगेतील काही नैसर्गिक उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला योगगुरु नित्यानंदम श्री यांनी दिला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2026 | 12:06 PM
मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू 'नित्यानंदम श्री'ने शेअर केला नॅचरल उपाय

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू 'नित्यानंदम श्री'ने शेअर केला नॅचरल उपाय

Follow Us
Follow Us:
  • आवळ्याचा आहारात समावेश आणि आवळ्याच्या तेलाने मसाज
  • दही, बदाम तेल, तिळाचे तेल आणि कोरफडीचा हेअर मास्क
  • तूप, गाजर आणि पौष्टिक आहारावर विशेष भर
केसांचे पांढरे होणे ही फार सामान्य घटना आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपले केस पांढरे होऊ लागतात. तथापि, आजकाल तरुणांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. आताच्या काळात फक्त वयोवृद्धांचे केस पांढरे होत नाहीयेत तर अनेक तरुणांचेही कमी वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत. याचे मूळ कारण म्हणजे चुकीची जीवनशैली आणि आहारातील चुकीचे बदल.

पांढरे केस हे म्हातारपणाचे लक्षण मानले जाते. अशात कमी वयात केस पांढरे होणे लाजीरवाणे ठरते. कुणालाही पांढरे केस फारसे आवडत नाही, ज्यामुळे लोक पार्लरमध्ये जाऊन आपले पांढरे केस काळे करुन घेतात. काहीजण काळे केस करण्यासाठी मेहंदीचा वापर करतात तर काहीजण डायचा वापर करुन पांढरे केस काळे करतात. परंतु अनेकदा डाय किंवा केमिकलयुक्त मेंहदीच्या वापरामुळे आपले केस आणखी डॅमेज होण्याची शक्यता असते. याच समस्येकडे लक्ष देता योगगुरु नित्यानंदम श्री यांनी युट्युब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांना मेहंदी आणि डायचा वापर न करता केसांना नैसर्गिकरित्या पांढरे कसे केले जाऊ शकते याची ट्रिक शेअर केली आहे.

कोणत्याही क्षणी बंद पडेल हृदयाची धडधड! रोजच्या आहारातून आजच गायब करा ‘हे’ चविष्ट पदार्थ, हृदय राहील मजबूत

केसांना नॅचरली काळे कसे करायचे?

व्हिडिओमध्ये आपला अनुभव शेअर करताना नित्यानंदम श्री यांनी सांगितले की, एक वेळ अशी होती जेव्हा त्यांच्या डोक्यावरचे जवळपास २० टक्के केस पांढरे झाले होते. सुरुवातीला त्यांनीही केस काळे करण्यासाठी मेहंदीचा वापर केला पण याचा त्यांच्या केसावर फार काही परिणाम दिसून आला नाही. उलट यामुळे त्यांचे केस थोडे कोरडे वाटू लागले. त्यानंतर, त्यांनी आपल्या आहारात आणि केसांच्या निगा राखण्याच्या नित्यक्रमात काही विशिष्ट घटकांचा समावेश केला.

आवळ्याचा वापर फायदेशीर

योगगुरु नित्यानंदम श्री यांनी सांगितले की, केसांना काळे करण्यासाठी त्यांनी आपल्या आहारात आवळ्याचा समावेश केला. ते रोज वेगवेगळ्या प्रकारे आवळ्याचा आहारात समावेश करु लागले. यापासून कधी ते आवळा ज्यूस बनवायचे, कधी आवळ्याची चटणी तर कधी कच्चा आवळा… नित्यानंदम श्री यांच्या मते, आवळ्याचा आहारात समावेश केल्याने केसांवर निश्चितच चांगला परिणाम दिसून येतो. ते आठवड्यातून दोनदा केसांवर आवळ्याच्या तेलाने मालिश देखील करायचे.

नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेला हेअर मास्क

आवळ्याव्यतिरिक्त, नित्यानंदम श्री कधीकधी आपल्या केसांवर दही, बदामाचे तेल, तिळाचे तेल आणि ताज्या कोरफडीच्या जेलपासून बनवलेला हेअर मास्क देखील लावतात. हा मास्क नैसर्गिक कंडिशनरसारखा काम करतो.

Raksha Bandhan 2026 : भारतीय रेल्वेची प्रवाशांना भेट, रक्षाबंधनानिमित्त या रुट्सवर सोडणार स्पेशन गाड्या

डाएटवर दिले लक्ष

नित्यानंदम श्री यांनी सांगितले की, या नैसर्गिक उपायासोबतच त्यांनी आपल्या आहारावरही विशेष लक्ष दिले. त्यांनी आपल्या आहारात तूप, गाजर आणि इतर पोषक घटकांचा समावेश केला. योगगुरु यांनी सांगितले की, नैसर्गिक उपायांच्या मदतीने ५ ते ६ महिन्यांत परिणाम दिसायला सुरुवात होते. त्यामुळे संयम ठेवा आणि नित्यनियमाने नैसर्गिक उपायांचा वापर करा. या टीप्सचा वापर जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात केला तर नैसर्गिकरित्या मुळापासून तुमचे केस काळे होण्यास मदत होईल.

Web Title: Natural ways to darken white hair amla hair mask and diet tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • hair care tips
  • lifestyle news
  • White Hair Problem

संबंधित बातम्या

Hair Fall Reasons: भारतीय तरुणांमध्ये केस गळतीची समस्या का वाढत आहे? Hair Fall वाढण्यामागे ‘ही’ आहेत कारणे
1

Hair Fall Reasons: भारतीय तरुणांमध्ये केस गळतीची समस्या का वाढत आहे? Hair Fall वाढण्यामागे ‘ही’ आहेत कारणे

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना
2

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना

Hair Care Tips: महागड्या ट्रिटमेंटपेक्षा केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याचा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ
3

Hair Care Tips: महागड्या ट्रिटमेंटपेक्षा केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याचा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम
4

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.