Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri Skincare: उपवासाच्या दिवशीही चेहरा राहील टवटवीत फक्त या घरगुती टोनरचा वापर करा

नवरात्रीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यावेळी अनेकजण उपवास करत असतात. याकाळात त्वचेला हायड्रेट ठेवणे फार गरजेचे असते. यासाठी तुम्ही घरी उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून अगदी सहज आणि सोपे टोनर तयार करू शकता. यांच्या वापराने उपवासातही तुमचा चेहरा फ्रेश आणि सुंदर राहील.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 26, 2024 | 10:43 AM
Navratri Skincare: उपवासाच्या दिवशीही चेहरा राहील टवटवीत फक्त या घरगुती टोनरचा वापर करा

Navratri Skincare: उपवासाच्या दिवशीही चेहरा राहील टवटवीत फक्त या घरगुती टोनरचा वापर करा

Follow Us
Close
Follow Us:

लवकरच नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. सं म्हंटल की, महिलांचा शृंगार आलाच. या काळात महिलांना नटायला फार आवडते. मात्र सणांच्या दिवसांत आपली फार लगबग होत असते ज्यामुळे याकाळात चेहऱ्याची काळजी घेणे फार गरजेचे असते. नवरात्रात अनेकजण उपवास करतात, यामुळे शरीराला पोषण द्रव्य मिळत नाही. अशा परिस्थितीत नवरात्रीच्या 9 दिवस चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.

आता आपला चेहरा सुंदर आणि फ्रेश ठेवण्यासाठी तुम्हाला बाजारातील महागडे प्रोडक्टस खरेदी करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, यासाठी तुम्ही घरच्या घरी काही सोप्या टिप्सचा वापर करू शकता. या टिप्सच्या मदतीने कामाच्या गडबडीतही तुमचा चेहरा टवटवीत आणि सुंदर दिसेल. हे घरगुती उपाय फार सोपे आणि साईचे आहेत.

हेदेखील वाचा – चेहरा आणि नाकावरील ब्लॅकहेड्स काढून छिद्र मोकळी करण्यासाठी लिंबू करेल तुमची मदत, अशाप्रकारे करा वापर

कोरफडीपासून बनवा टोनर

त्वचा हायड्रेट करण्यासाठी अनेकदा कोरफडीचा वापर केला जातो. तुम्ही यापासून टोनर तयार करून आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. घरात कोरफडीचा टोनर तयार करणे फार सोपे आहे. यासाठी प्रथम अर्धा कप गुलाब जल घ्या. नंतर त्यात एक कप ताजा कोरफडीचा गर मिळवा. आता हा तयार टोनर एका बाटलीत साठवा आणि हवा तेव्हा चेहऱ्याला लावा. तुम्ही तुमच्या सोईनुसार कधीही याचा वापर करू शकता. याच्या नियमित वापराने चेहऱ्यावर नॅचरल ग्लो दिसू लागतो.

तुळशीच्या पानांपासून बनवा टोनर

तुळशीमध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात जे त्वचेवरील बॅक्टेरिया आणि जंतू दूर करण्यास मदत करतात. तुम्ही घरीच तुळशीचा टोनर तयार करू शकता. यासाठी 7-9 तुळशीची पाने एका टोपात टाक. नंतर त्यात एक कप पाणी घालून मध्यम आचेवर उकळू द्या. 18-20 मिनिटे याला उकळवून घ्या आणि मग गॅस बंद करा. थंड झाल्यावर हे पाणी एका बाटलीत काढा आणि मग त्वचेवर याचा स्प्रे करा.

 हेदेखील वाचा – केस खूप पातळ झालेत? मग बाजारातील केमिकल प्रोडक्टसचा वापर थांबवा आणि हे हर्बल उपाय करून पहा

तांदळापासून तयार करा टोनर

तांदळाचे पाणी चेहऱ्यावर चमक आणण्यास आणि चेहऱ्याला गोरे बनवण्यास मदत करते. यात जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हे टोनर घरच्या घरी बनवण्यासाठी प्रथम एक चमचा तांदूळ एका भांड्यात टाका. मग यात पाणी टाका आणि ढगाळ होईपर्यंत ढवळत राहा.यानंतर हे पाणी एका बाटलीत काढा. त्यात कापसाचे पॅड भिजवा आणि नंतर वापरा. याचा नियमित वापर चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यास मदत करेल.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Navratri skincare routine how to make homemade face pack and tonner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 10:42 AM

Topics:  

  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ
1

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ
2

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी
3

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

फ्रिजमध्ये ठेवलेले ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक
4

फ्रिजमध्ये ठेवलेले ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.