Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा

Lifestyle News : निरोगी राहण्यासाठी केवळ काय खाता हेच नाही, तर किती आणि कशा पद्धतीने खाता हेही महत्त्वाचे आहे. जपानमधील एक खास खाद्यपरंपरा याच गोष्टीवर भर देते. जाणून घ्या या परंपरेमागचा विचार आणि तिचे महत्त्व.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 13, 2026 | 08:15 PM
जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे 'Hara Hachi Bu' नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे 'Hara Hachi Bu' नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा

Follow Us
Follow Us:
  • काय आहे जपानची Hara Hachi Bu परंपरा?
  • ओकिनावातील लोकांच्या जीवनशैलीशी काय आहे संबंध?
  • जेवताना कोणत्या सवयी ठेवतात फायदेशीर?
आरोग्याच्या वाढत्या समस्या पाहता आजकाल सर्वजण हेल्दी लाईफस्टाईलकडे वळू लागले आहेत. जगभरात जपान हा देश आपल्या शिष्ठाचारी आणि हेल्दी लाईफस्टाईल ओळखला जातो. तथापि, तुम्हाला माहिती आहे का? जपानमध्ये खाण्यासंबंधित Hara Hachi Bu नावाच्या एका परंपेरेचे पालन केले जाते. ही परंपरा विशेषतः जपानच्या ओकिनावा प्रदेशाशी संबंधित आहे आणि संतुलित आहाराला प्रोत्साहन देण्याचा एक मार्ग म्हणून याकडे पाहिले जाते.

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!

काय आहे Hara Hachi Bu?

Hara Hachi Bu ही एक जपानी म्हण आहे, याचा अर्थ आहे पोट ८० टक्के भरेपर्यंत जेवणे आणि नंतर बंद करणे. याचा उद्देश पोट अतिभरुन अस्वस्थ होण्याऐवजी, पोट थोड कमी भरुन शरीराला पुरेसे अन्न पुरवणे असा आहे. अनेकदा शरीराच्या आवश्यकतेहून जास्त पटीने अन्न खाल्ले जाते, जे पचायला जड जाते आणि मग पोटावर चरबी जमा होऊ लागते. याउलट जर तुम्ही पुरेश्या प्रमाणात किंवा थोड कमी अन्न खाल्ले तर वजन वाढत नाही, शिवाय ते पचायलाही सोपे जाते. सोप्या भाषेत याचा अर्थ असा होतो की, ताटातील संपूर्ण जेवण संपवण्यापेक्षा शरीराला जितकी गरज आहे फक्त तितकेच अन्न खावे. यामुळे आपली भूक वाढत नाही आणि शरीराला सवय लागते.

ओकिनावाशी जोडलेली परंपरा काय आहे?

जपानमधील ओकिनावा हा द्वीपप्रदेश, तेथील वृद्ध आणि दीर्घायुषी लोकसंख्येमुळे बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. तेथील लोकांच्या पारंपारिक आहारावर आणि जीवनशैलीवर संशोधन करणाऱ्या संशोधकांनी Hara Hachi Bu सारख्या सवयींचा उल्लेख आपल्या शोधात केला आहे. तथापि, फक्त या नियमाचे पालन केल्याने दिर्घायुषी लाभेल असे म्हणणे योग्य ठरणार नाही. आहार, शारीरिक हालचाल, झोप, सामाजिक संबंध, आनुवंशिकता यांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो.

Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा

खाण्याच्या पद्धतीमागे काय विचार आहे?

Hara Hachi Bu चा मुख्य विचार खाताना घाई न करता आपल्या शरीराच्या गरजेनुसार आणि संकेतानुसार जेवण करणे असा आहे. अनेकदा टीव्ही बघत, मोबाईचा वापर करत आपण जेवायला बसतो. यामुळे जेवणाकडे आपले लक्ष नसते. आपण भराभरा अनावश्यक आहार करतो ज्यामुळे पोट गच्च होते. यामुळेच या पद्धतीचा अवलंब करताना मर्यादित जेवण आणि त्या जेवणाचे हळूहळू सेवन करणे महत्त्वाचे ठरते. आरामात जेवताना जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे पोट भरले आहे तेव्हा जेवण करणे थांबवा आणि अनावश्यक प्रमाणात आहाराचे सेवन करणे थांबवा.

 

Web Title: Japanese hara hachi bu eating rule 80 percent full okinawa healthy lifestyle nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Japan
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!
1

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!

Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत उपवास करण्यााचा विचार आहे? व्रतात काय खावे आणि काय टाळावे ते आधीच जाणून घ्या
2

Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत उपवास करण्यााचा विचार आहे? व्रतात काय खावे आणि काय टाळावे ते आधीच जाणून घ्या

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव
3

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव

Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
4

Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.