नाचणी खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे
मागील अनेक वर्षांपासून दैनंदिन आहारात गहू, तांदूळ, नाचणी, बाजरी इत्यादी धान्यांचे सेवन केले जात आहे. हे धान्य आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहेत. त्यातील आहारात प्रामुख्याने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे नाचणी. नाचणीपासून नाचणीची भाकरी, स्मूदी, लाडू इत्यादी अनेक पदार्थ बनवून खाल्ले जातात. मधुमेह आणि इतर आजाराने त्रस्त असलेले लोक दैनंदिन आहारात तांदळाची भाकरी खाण्याऐवजी नाचणीची भाकरी खाण्यास प्राधान्य देतात. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, ज्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. दैनंदिन आहारात नाचणीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला नाचणी खाल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर इत्यादी अनेक घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. लहान मुलांच्या नाश्त्यात किंवा गरोदर स्त्रियांच्या आहारात नाचणीयुक्त पदार्थ असतात. नाचणीचे सेवन केल्यामुळे हाडे मजबूत होतात. हाडांच्या निरोगी वाढीसाठी दैनंदिन आहारात नाचणीचे सेवन करावे. यामुळे शरीराला ताकद मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिवाय यामध्ये विटामिन डी सुद्धा आढळून येते. थंडीच्या दिवसांमध्ये बाहेर कमी सूर्यप्रकाश असतो, अशावेळी आहारात नाचणीच्या भाकरीचे सेवन करावे.
नाचणीमध्ये अमिनो आम्ल आढळून येते, ज्यामुळे त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी होतात. तसेच नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात, ज्यामुळे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते. फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात नाचणीचे सेवन करावे. नाचणीचे सेवन केल्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन आरोग्यसंबंधित समस्या कमी होतात. यामध्ये असलेले फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात.
शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येतात. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करतात. पण खराब कोलेस्ट्रॉल शरीरासाठी हानिकारक ठरते. यामुळे हृदयाच्या आणि शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात नाचणीचे सेवन करावे. नाचणीयुक्त पदार्थ आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
नाचणीच्या पिठाची स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, पाणी गरम करून त्यात नाचणीचे पीठ टाकून नाचणी वाफवून घ्या. तयार केलेले पीठ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात दूध, भिजवलेले ड्राय फ्रूट्स, केळी टाकून मिक्सरमध्ये वाटून स्मूदी तयार करा. तयार केलेली स्मूदी ग्लासात ओतून पिण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली नाचणी स्मूदी.