अंगणातील लालभडक जास्वंदीच्या फुलांपासून बनवा 'होममेड कंडिशनर
कोरड्या आणि निस्तेज झालेल्या केसांना पोषण देण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी केसांना हेअरमास्क लावला जातो तर कधी केसांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या ब्रँडचे प्रॉडक्ट लावले जातात. मात्र तरीसुद्धा केस सुंदर आणि चमकदार दिसत नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केस मोकळे सोडून बाहेर गेल्यानंतर धूळ, मती आणि प्रदूषणामुळे पूर्णपणे खराब होऊन जातात. तेलकट किंवा चिकट झालेले केस पुन्हा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे. तेलकट केस योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे केसांमध्ये कोंडा किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावून केस स्वच्छ धुवावे. (फोटो सौजन्य – iStock)
केसांच्या वाढीसाठी केसांना वरून पोषण देण्यापेक्षा आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. यासाठी आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे शरीरासोबत केसांना देखील पोषण मिळेल. केस शॅम्पूचा वापर करून धुतल्यानंतर केस स्मूथ आणि सिल्की दिसण्यासाठी केसांना कंडिशनर लावले जाते. मात्र केमिकलयुक्त कंडिशनरचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेले कंडिशनर वापरावे. यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस स्मूथ होतात.
जास्वंदीच्या फुलांचे कंडिशनर लावल्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस सुंदर दिसू लागतात. केसांच्या निरोगी आणि चमकदार वाढीसाठी केमिकलयुक्त ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांना पोषण द्यावे. यामुळे केस मऊ आणि सिल्की होतील. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती प्रॉडक्ट वापरण्यास जास्त प्राधान्य द्यावे.