तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीराला होणारे फायदे:
शरीर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी नियमित अंघोळ केली जाते. उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवशी शरीराला अतिशय घाम येतो. घामामुळे चिकट किंवा तेलकट झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी बरेचजण दिवसभरातून दोनदा अंघोळ करतात. मात्र योग्य पद्धतीने अंघोळ केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. जास्त प्रमाणात घाम आल्यामुळे अंडरआर्म्स किंवा शरीराला दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवू लागते. अशावेळी डिओड्रंट्स आणि परफ्यूमचा वापर केला जातो.. डिओड्रंट्स किंवा परफ्यूम मारल्यामुळे अंगाला येणारी दुर्गंधी कमी होते. मात्र नेहमी नेहमी केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्वचेवर पुरळ येणे, मुरूम येणे किंवा त्वचा लाल होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
हातापायांना सतत मुंग्या येतात? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध
अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकल्यामुळे त्वचेसंबंधित सर्वच समस्या दूर होतात. तुरटीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेची गुणवत्ता सुधारतात. यासोबतच आरोग्यासाठी सुद्धा प्रभावी आहे. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आढळून येतात. घामामुळे त्वचेवर साचून राहिलेले जंतू कमी होऊन त्वचा स्वच्छ होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
काखेत असलेल्या घामामुळे शरीराला दुर्गंधीचा वास येऊ लागतो. याशिवाय कपडे देखील खराब होण्याची शक्यता असते. काखेत असलेल्या घामामुळे संपूर्ण शरीराला दुर्गंधीचा वास येऊ लागतो. या दुर्गंधीमुळे काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. त्यामुळे घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात तुरटीचा वापर करावा. अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकावी. तुरटीच्या पाण्याची अंघोळ केल्यामुळे शरीरातील सर्व बॅक्टरीया, जंतू नष्ट होतात आणि शरीर स्वच्छ राहते.
तुरटीमध्ये असलेले नैसर्गिक घटक आरोग्यासाठी प्रभावी ठरतात. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा स्वच्छ होते. त्वचेवर जमा झालेले लहान मोठे बॅक्टरीया कमी होतात आणि त्वचा स्वच्छ होते. ग्रोइन एरिया, अंडरआर्म्स आणि बोटांच्या मधल्या भागांमध्ये साचून राहिलेल्या घामामुळे त्वचेवर रॅश येणे, त्वचा लाल होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीच्या पाण्याने अंघोळ करावी.
तुरटीचा वापर आरोग्यासाठीच नाहीतर मानसिक तणाव कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो. अनेकदा शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतो. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात तुरटीचा वापर करावा. तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे मन शांत होते, शारीरिक थकवा कमी होतो, मानसिक तणावापासून सुटका मिळवण्यासाठी तुरटी अतिशय प्रभावी आहे.