संत्र्याची साल फेकून देण्याऐवजी 'या' पद्धतीचा वापर करून बनवा फेस टोनर
चवीला आंबट गोड असलेली संत्री हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. संत्र्याचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह त्वचेला देखील अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात नियमित एक संत्र खाल्यामुळे त्वचा आणि शरीर सुधारण्यास मदत होते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्सचे डाग, मुरूम, डार्क स्पॉट इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी संत्र्याचे सेवन करावे. संत्र खाल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते. संत्र्यासोबतच संत्र्याची साल देखील आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. संत्र्याच्या सालीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेवरील मुरूम, पिंपल्स, डाग कायमचे निघून जातात.(फोटो सौजन्य – iStock)
सर्वच महिलांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. सुंदर त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा डाग आल्यानंतर त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर केला जातो. यामुळे त्वचा फारकाळ सुंदर आणि चमकदार दिसत नाही. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संत्र्याच्या सालीचा वापर करून होममेड टोनर बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने टोनर तयार केल्यास त्वचा अधिक चमकदार आणि हायड्रेट राहील.
उन्हाळ्यात घामामुळे त्वचा चिकट होते? त्वचेवर रॅश येतात? तेलकट त्वचेवर लावा ‘हे’ घरगुती पदार्थ
संत्र्याची साल त्वचेला आतून पोषण देते. याशिवाय चेहऱ्यावर आलेले डाग कमी करण्यासाठी संत्र्याची साल अतिशय प्रभावी आहे. या सालीमध्ये असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट आणि फ्रेश ठेवतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे छिद्र स्वच्छ करून त्वचा उजळदार करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे संत्र्याचे टोनर तुम्ही मेकअप करण्याआधी नियमित वापरू शकता.