प्रिमॅच्युअर ओव्हरीयन इन्सफिशियन्सी म्हणजे नक्की काय (फोटो सौजन्य - iStock)
प्रिमॅच्युअर ओव्हरीयन इन्सफिशियन्सी (POI) ही तरुणींमधील प्रजनन क्षमता आणि एकूणच हार्मोनल आरोग्यावर परिणाम करते. म्हणूनच, महिलांनी याकडे दुर्लक्ष करू नये. ओव्हेरियन रिजुवेनेशन थेरपी म्हणजे नेमके काय आहे, त्याची कारणे, लक्षणे आणि फायदे या लेखाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. डॉ. निशा पानसरे, फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, खराडी, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
प्रिमॅच्युअर ओव्हरीयन इन्सफिशियन्सी ही समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा एखाद्या महिलेच्या अंडाशय 30-35 वर्षांच्या आधी सामान्यपणे कार्य करणे थांबवतात. यामुळे अनियमित मासिक पाळी किंवा मासिक पाळीचे चक्र थांबणे, कमी इस्ट्रोजेन पातळी आणि अगदी वंध्यत्वाची समस्या उद्भवते. रजोनिवृत्ती साधारणपणे ४५ ते ५५ वयोगटात येचे, परंतु अशी समस्या असलेल्या महिलांना त्यांच्या प्रजनन क्षमता आणि संप्रेरक उत्पादनात बदल खूप लवकर किंवा अनेकदा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल दिसून येतो. ही स्थिती भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकते, विशेषतः ज्या महिला गर्भधारणा करू इच्छितात आणि मातृत्वाची इच्छा आहे त्यांना यामुळे अन्क आव्हानांचा सामना करावा लागतो. ही लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी पारंपारिक उपचार हे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) वर लक्ष केंद्रित करतास. मात्र, महिलांना प्रजनन क्षमता पुनर्संचयित करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या वंध्यत्व निवारण तज्ज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
मुदतपूर्व प्रसुतीबाबत या आहेत 4 गैरसमजुती, महिलांना माहीत असायलाच हवे
कशामुळे निर्माण होते समस्या
ही समस्या का निर्माण होते
प्रिमॅच्युअर ओव्हरीयन इन्सफिशियन्सी हे अनुवांशिक घटकांमुळे, स्वयंप्रतिकार रोगांमुळे, काही संसर्गांमुळे, कर्करोगाच्या उपचारांमुळे किंवा ज्ञात कारणाशिवाय (इडिओपॅथिक) उद्भभवू शकते.
लक्षणांमध्ये हॅाट प्लॅश, रात्री घाम येणे, मूड स्विंग्ज, योनीचा कोरडेपणा आणि गर्भधारणेत अडचणी येणे यांचा समावेश आहे. महिलांमध्येप्रिमॅच्युअर ओव्हरीयन इन्सफिशियन्सी साठी उपचार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) च्या स्वरूपात असू शकतात जेणेकरून लक्षणे व्यवस्थापित केली जाऊ शकतील आणि हाडे आणि हृदयाचे आरोग्य संरक्षित केले जाते.
ओव्हेरियन रिजुवेनेशन थेरपी
अंडाशयांची अंडी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांचे पुनरुज्जीवन करणे याला “ओव्हेरियन रिजुवेनेशन” म्हणतात. सध्या, प्री मॅच्युअर ओव्हरीयन इनसफिशीयन्सीचे निदान झालेल्या महिलांमध्ये प्रजनन क्षमता पुनर्संचयित करण्यासाठी ओव्हेरियन रिजुवेनेशन थेरपी पर्याय वापरला जातो.
अद्याप प्रायोगिक टप्प्यात असताना, या थेरपीमध्ये प्लेटलेट-रिच प्लाझ्मा (PRP) इंजेक्शन्स, स्टेम सेल थेरपी आणि इन-व्हिट्रो अॅक्टिव्हेशन (IVA) सारख्या तंत्रांचा समावेश आहे जे निष्क्रिय फॉलिकल्सना उत्तेजित करू शकतात आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात.
नॉर्मल डिलिव्हरीनंतर टाके पडलेल्या नाजूक भागावरील त्वचेची अशी घ्या काळजी
कशी असते प्रक्रिया
कशी असते प्रक्रिया जाणून घ्या
जेव्हा पीआरपी थेरपीचा विचार केला जातो तेव्हा, महिलेच्या रक्तातून वाढीच्या घटकांनी समृद्ध प्लेटलेट्स काढण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते, जी नंतर ऊतींची दुरुस्ती आणि सक्रियता वाढविण्यासाठी अंडाशयात इंजेक्ट ( टोचली जाते) केली जाते.
प्रिमॅच्युअर ओव्हरीयन इन्सफिशियन्सी आशादायक असली तरी, तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ती अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि व्यापकप प्रमाणात उपलब्ध नाही. ती क्लिनिकल चाचण्यांचा एत भाग आहे आणि दीर्घकालीन सुरक्षितता आणि यश दर अद्यापही पूर्णपणे स्थापित झालेले नाहीत.
प्रिमॅच्युअर ओव्हरीयन इन्सफिशियन्सी असलेल्या महिलांसाठी ज्यांच्याकडे कमी पर्याय आहेत, अशा महिलांकरिता ही प्रगती आशेचा एक नवीन किरण ठरते. संशोधन जसजसे पुढे जाईल तसतसे हे थेरपी आणखी नवीन शक्यता निर्माण करु शकते. प्रजनन सल्लागाराशी चर्चा करणे आणि ही थेरपी समजून घेणे तुमच्यासाठी अत्यावश्यक असेल. प्री मॅच्युअर ओव्हरीयन इनसफिशीयन्सी असलेल्या महिलांनी या स्थितीकडे दुर्लक्ष करू नये आणि वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.