Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paneer Wrap Recipe : विकेंडला मुलांना करा खुश, चपाती-भाजी नाही त्यांना खाऊ घाला टेस्टी पनीर रॅप; नोट करा रेसिपी

Recipe : मुलांना तीच तीच बोरींग भाजी-चपाती खाऊन कंटाळा येतो. अशात बाहेरचे अनहेल्दी फूड खाऊ घालण्याऐवजी तुम्ही घरीच टेस्टी आणि हेल्दी असा पनीर रॅप तयार करु शकता. चला याची रेसिपी नोट करुन घेऊयात.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 10, 2026 | 10:00 AM
Paneer Wrap Recipe : विकेंडला मुलांना करा खुश, चपाती-भाजी नाही त्यांना खाऊ घाला टेस्टी पनीर रॅप; नोट करा रेसिपी

Paneer Wrap Recipe : विकेंडला मुलांना करा खुश, चपाती-भाजी नाही त्यांना खाऊ घाला टेस्टी पनीर रॅप; नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरणारी रेसिपी.
  • पनीर रॅप रेसिपी.
  • हेल्दी आणि टेस्टी, मुलांच्या आवडीचा पदार्थ.
विकेंड स्पेशल तुम्हीही घरी काही टेस्टी आणि नवीन पदार्थ बनविण्याच्या विचारात आहात? मग पनीर रॅप तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल. पनीर आरोग्यासाठी पाैष्टिक ठरतो तर मुलांना चपाती खाऊ घालण्यासाठी हा एक भन्नाट पर्याय आहे. अनेकदा तीच तीच भाजी-चपाती खाऊन मुलांना कंटाळा येतो अशात विकेंडला त्यांच्या आवडीचा पदार्थ पण त्याला एक हेल्दी ट्विस्ट देऊन तुम्ही स्वत:ला आणि मुलांना दोघांना खुश करु शकता.

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी

उरलेल्या शिळ्या चपात्यांपासून तुम्ही हा रॅप तयार करु शकता. पनीर रॅप एक स्ट्रीट फूड असून बाजारात तुम्हाला हा पदार्थ दिसून येईल. लोक फार आवडीने याची चव घेतात. पण यातील मैद्याची चपाती, पदार्थाची गुणवत्ता हवी तितकी चांगली नसते. त्यामुळे घरीच तुम्ही टेस्टी, हेल्दी आणि स्वच्छतेत स्ट्रीट स्टाईल पनीर रॅप तयार करणे एक चांगला पर्याय ठरतो. चला रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करुन घेऊयात.

साहित्य

  • पनीर: १५० ग्रॅम (छोटे तुकडे करून)
  • गव्हाच्या पोळ्या / चपात्या: २-३
  • कांदा: १ (उभा किंवा बारीक चिरलेला)
  • टोमॅटो: १ (बारीक चिरलेला)
  • शिमला मिरची: अर्धी (उभी पातळ चिरलेली)
  • तेल किंवा बटर: २ चमचे
  • आलं-लसूण पेस्ट: १ छोटा चमचा
  • अर्धा चमचा हळद
  • १ चमचा तिखट (लाल मिरची पावडर)
  • १ चमचा धने-जिरे पावडर
  • चाट मसाला
  • मेयोनीज
  • टोमॅटो केचप
  • हिरवी पुदिन्याची चटणी
  • चवीनुसार मीठ
Tomato Pithla Recipe: पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत टोमॅटोच पिठलं, नोट करा भन्नाट चवीची रेसिपी

कृती

  • पनीर रॅप तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल किंवा तूप घालून त्यात आलं-लसूण पेस्ट परतून घ्या.
  • साधारण १ मिनिटाने यात चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घालून भाज्या हलक्या परता.
  • आता त्यात हळद, लाल तिखट, धने-जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घाला आणि सर्व साहित्य नीट एकत्र करा.
  • मसाले छान शिजले की, यात पनीरचे तुकडे, वरुन थोडा चाट मसाला घाला आणि झाकण ठेवून २ मिनिटे साहित्याला छान शिजवून घ्या.
  • गॅस बंद करा आणि पनीरच्या तयार स्टफिंगला थंड होऊ द्या.
  • हा रॅप तयार करण्यासाठी तुम्ही उरलेल्या शिळ्या चपात्यांचाही वापर करु शकता.
  • चपातीवर टोमॅटो केचप, हिरवी चटणी किंवा मेयोनीज समान पसरवून घ्या.
  • आता यावर तयार पनीरची स्टफींग पसरवा.
  • लक्षात घ्या, पोळीच्या एका कोपऱ्याला तुम्हाला ही स्टफींग टाकायची आहे.
  • तुम्ही यावर चीज देखील घालू शकता.
  • आता पोळीचा छान रोल बनवा आणि गॅसवर बटर टाकून हा रॅप त्यावर छान शेकून घ्या.
  • खमंग वास आला आणि पोळी बाहेरून हलकी कुरकुरीत झाली की तुमचा रॅप तयार आहे.

Web Title: Paneer wrap recipe easy tasty paneer wrap for kids weekend snack recipe nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • healthy recipe
  • marathi recipe
  • paneer

संबंधित बातम्या

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी
1

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
2

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
3

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘
4

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.