Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
Garlic Chutney Recipe : बोरींग जेवण खाऊन कांटाळा आला असेल तर तुमच्या रात्रीच्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी घरी बनवा तिखट चवीची लसणाची चटणी. ही चटणी अनेक दिवस साठवून ठेवता येते.
Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
Follow Us
Follow Us:
लसणाच्या चटणीची रेसिपी.
जेवणाची चव वाढवण्यासाठी परफेक्ट पर्याय.
रेसिपी एकदा तरी घरी नक्की ट्राय करा.
अनेकदा तीच भाजी-चपाती आणि डाळ-भात खाऊन कंटाळा येतो. जेवणाची रंगत वाढवायची असेल तर झणझणीत चटणी एक चांगला पर्याय ठरते. जुन्या काळापासून जेवणाची चव वाढवण्यासाठी ताटात चटणी आवर्जून सर्व्ह केली जाते. आता चटणी तर अनेक प्रकारची असते पण आज या लेखात आपण तिखट लसणाची चटणी कशी तयार करायची याची भन्नाट रेसिपी जाणून घेणार आहोत. या चटणीची खासियत म्हणजे आठवडाभर तुम्ही ही चटणी साठवून ठेवू शकता आणि अवघ्या १० मिनिटांत ही रेसिपी तयार होते. भाजी काय बनवावी ते सुचत नसल्यास चपाती-भाकरीसोबत नुसती ही चटणी जरी खाल्ली तरी तुमचे पोट आणि मन सहज भरेल. चला तर मग रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.