Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी
Rajgira Upma Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्ही हेल्दी आणि टेस्टी पर्याय शोधत असाल तर राजगिऱ्याचा उपमा तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरेल. याची रेसिपी फार सोपी आहे.
Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी
Follow Us
Follow Us:
सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर हा हटके पर्याय नक्की ट्राय करा.
कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी सकाळच्या धावपळीतही सहज बनवता येते.
चव आणि पौष्टिकतेचा मेळ साधणारा हा पदार्थ तुमच्या नाश्त्याच्या मेनूमध्ये वेगळी रंगत आणेल.
सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी फार महत्त्वाचा ठरत असतो आणि म्हणूनच सकाळचा नाश्ता स्किप न करण्याचा सल्ला दिला जातो. नाश्त्यासाठी पोहे, इडली-सांबार, पराठा हे काही लोकप्रिय ऑप्शन्स आहेत. पण तुम्ही कधी राजगिऱ्याचा उपमा हा पदार्थ ट्राय केला आहे का? राजगिरा हा अधिकतरवेळी उपवासात खाल्ला जातो. पण यापासून उपमा तयार केला जाऊ शकतो हे अनेकांना ठाऊक नाही. हा उपमा फक्त चवीलाच चांगला लागत नाही तर आरोग्यासाठीही तो फायदेशीर ठरतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हा उपमा फार कमी वेळेत तयार होतो ज्यामुळे सकाळच्या घाईगडबडीच्या वेळेसाठी तो परफेक्ट पर्याय ठरतो. चला तर मग या रेसिपीसाठीलागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.